गुलाब फुलांची तोडणी करताना... | पुढारी

गुलाब फुलांची तोडणी करताना...

गुलाब फुलांची तोडणी मुख्यत्वे बाजारपेठा आणि वाहतुकीची व्यवस्था यावर अवलंबून असते. जवळच्या बाजारपेठांसाठी किंचित उमललेली फुले, तर लांबच्या बाजारपेठांसाठी कळी अवस्थेत असलेल्या परंतु नंतर उमलू शकतील अशा कळ्या काढाव्यात. फुलांची काढणी सूर्योदयापूर्वी धारदार कात्रीने करावी आणि फुलांचे दांडे पाण्यात राहतील इतके पाणी भरून बादलीत ठेवावेत.
2 टक्के साखरेच्या द्रावणात फुले बुडवून ठेवल्यास त्यांचे आयुर्मान वाढते.

1 किंवा 2 डझनाच्या गड्ड्यात प्रतवारीप्रमाणे, रंगाप्रमाणे, जातीप्रमाणे आणि अवस्थेप्रमाणे वर्तमानपत्रात गुंडाळून त्यांच्या दोन्ही टोकांना रबर बँड लावावा. दूरवरच्या बाजारपेठांसाठी अशी फुले 6 तास 2 अंश सेल्सिअस तापमानात साठवावीत. नंतर कागदी फुठ्ठ्यांच्या खोक्यात नीट मांडणी करून खोकी बंद करावीत आणि बाजारात पाठवावीत. परदेशात फुले पाठवायची झाल्यास अशी खोकी शीतगृहात साठवून शीतवहनामार्फत त्यांची वाहतूक करावी.

– सतीश जाधव

Back to top button