निशिगंधातील वैविध्य | पुढारी

निशिगंधातील वैविध्य

निशिगंधाची सिंगल या प्रकारातील फुले पांढरीशुभ्र असून, अत्यंत सुवासिक असतात. या प्रकारामध्ये शृंगार, प्रज्वल या जाती आहेत. ही
फुले हार, वेणी, गजरा, माळा यासाठी वापरतात. तसेच फुले रजनी ही जात सुट्या फुलांच्या अधिक उत्पादनासाठी आणि कटफ्लॉवर म्हणून फुलदाणीत ठेवण्यासाठी चांगली आहे. डबल प्रकारामध्ये सुवासिनी, वैभव आणि स्थानिक डबल या जाती आहेत. या जातीची फुले फुलदाणीत ठेवण्यास योग्य असतात. सेमी डबल या प्रकारच्या जातीची फुले फुलदाणीत ठेवण्यासाठी अथवा गुच्छ तयार करण्यासाठी वापरतात. व्हेरिगेटेड प्रकारामध्ये सुवर्णरेखा आणि रजतरेखा या जाती आहेत. या जाती बागेत, कुंडीमध्ये शोभेसाठी लावण्यासाठी चांगल्या आहेत.

Back to top button