गटशेती का गरजेची? | पुढारी

गटशेती का गरजेची?

शहरीकरण झपाट्याने वाढल्यामुळे शेतीचे क्षेत्र कमी होत आहे. मूळ शेतीत वाटे, हिस्से पडल्यामुळे पूर्वी पन्‍नास, शंभर किंवा दहा-वीस एकरांचे मालक असलेले शेतकरी सध्या दहा-वीस गुंठ्यांवर आले आहेत. तशी थोडीशी शेतजमीन असताना शेती करण्यात अनेक अडचणी येतात आणि कितीही राबले तरी मुळातच शेतजमीन फारच थोडी असल्यामुळे उत्पन्‍न दिसत नाही आणि अशा जमिनीतून आणखी उत्पन्‍न मिळविण्यासाठी कोणतीही ठोस गुंतवणूक करण्यात अनेक मर्यादा येतात.

त्यावर उपाय म्हणून गटशेती हा पर्याय पुढे येऊ लागला आहे. त्याअंतर्गत अल्पभूधारक शेतकरी एकत्र येऊन त्यांच्या क्षेत्रात एकाच पिकाची शेती करतात. गटशेतीमुळे संबंधित पिकांच्या उत्पादनासाठी कमीत कमी खर्च येतो आणि असा माल निर्यात करणेसुद्धा शक्य होते. त्याचबरोबर गटशेतीअंतर्गत येणार्‍या त्या विशिष्ट पिकासाठी ते ब्रँडनेमसुद्धा तयार करू शकतात. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांचे एकत्रीकरण करून शेतकर्‍यांच्या त्या गटांना अनुदान देणे शक्य होते.

Back to top button