कांद्याची रोपवाटिका आणि तणांचे नियंत्रण | पुढारी

कांद्याची रोपवाटिका आणि तणांचे नियंत्रण

कांद्याची रोपवाटिका हा एक महत्त्वाचा भाग असून ती केल्यामुळे पुनर्लागवडीसाठीची जमिनीची मशागत करण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. रोपे तयार करताना हरळी किंवा लव्हाळा असणारी जमीन रोपवाटिकेसाठी निवडू नये. रोपवाटिका क्षेत्रासाठी जमिनीची खोल नांगरट करून जमीन निर्जंतुकीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे जेणेकरून रोग आणि किडींचा उपद्रव होणार नाही आणि 20 सेंमी उंचीचे गादी वाफे तयार करावे. कांद्याचे बी पेरण्यापूर्वी बियाण्याची बीजप्रक्रिया करून घेणे महत्त्वाचे बी पेरण्यापूर्वी बियाण्याची बीजप्रक्रिया करून घेणे महत्त्वाचे आहे. 3 ग्राम थायरम प्रति किलो बियाण्याला चोळावे आणि पेरणी करावी.

कांदा पिकावरील तण आणि तणांचे नियंत्रण

कांदा पिकातील तण हे हंगामानुसार थोडाफार फरक दिसत असला तरी ह्या पिकामध्ये हरळी, लव्हाळा, बटवा, जंगली चौलाई, कृष्णानील, हरणखुरी, अमरवेल, मकरा, चिवई, तिप्पत्ती, लहसुवा, नुनखरा, भांगडा, पांढराी सेंजी, पिवळी सेंजी, सातगाठी, सत्यनाशी, पत्थरचडा, मकोर, कॉस, हजारदार, कुकरोंद्धा, जंगली गाजर, जंगली भोगी, जंगली कांदा, जंगली जाई, खिसारी, गाजरगवत, माठ इत्यादी तणांचे कमी अधिक प्रमाण तेवढे पिकास अधिक नुकसान आणि तण नियंत्रणाच्या अधिक खर्च याच कारणामुळे वेगवेगळ्या तणनाशकांची निवड करण्यात आली आहे. कांदा पिकातील तण हे खुरपणीचा साहाय्याने वारंवार काढली जातात आणि जास्त प्रमाणात तणांचा प्रादुर्भाव झाल्यास तणनाशकाचा वापर करून तणांचे नियंत्रण केले जाते.

कांदा रोपवाटिकेतील तणांचा बंदोबस्त

बी पेरून उगवत असतानाच त्या सोबत तणांचे बी देखील उगवत असते. वाफ्यात कच्च्या शेणखताचा वापर केला असेल तर वाफ्यात तणांचे प्रमाण खूपच जास्त येते. तणांचे बी आणि कांदा बी सोबत रूजवून रोपे वाढतात. त्यामुळे निंदणी करणे अवघड तसेच खर्चिक होते. प्रसंगी तण जोमात वाढते आणि कांदा रोपे तणांनी झाकून जातात, पण तण बारीक असल्यामुळे ते निंदणी करणे वेळखाऊ होते. बर्‍याच वेळा शेतकरी रोपावर तणनाशकांचा वापर करतात त्यामुळे तण कमी होते, जळते. पण त्याच बरोबर रोपांचे शेंडे सुद्धा जळतात.

रोपवाटिकेतील तणांच्या बंदोबस्ताकरिता बी पेरणीपूर्वी वाफ्यावर स्टॅम्प (पेंडीमिथिलिन) 2 मिली प्रति लिटर पाणी ह्या प्रमाणात मिसळून फवारणी केल्यानंतर खुरप्याच्या सहाय्याने रेघा ओढून ओळीत बी पेरणी करावी. तर तणांचे बी रूजवत नाही परंंतु कांद्याचे बी चांगले बी चांगले उगगवून येते.

– सती जाधव

Back to top button