पूर्वशीतकरण करताना… | पुढारी

पूर्वशीतकरण करताना...

स्वीटकॉर्नमधील साखरेचे प्रमाण टिकून राहण्यासाठी; तसेच त्याचा स्वाद आणि मऊपणा टिकून राहण्यासाठी जी कणसे बाहेर पाठवावयाची असतात, त्यांचे पूर्वशीतकरण म्हणजेच प्री-कूलिंग करावे. यासाठी अनेक पद्धतींचा वापर केला जातो.

पूर्वशीतकरण म्हणजेच प्रिकूलिंग. त्या खालीलप्रमाणे आहेत. 

1) पहिली पद्धत म्हणजे पाण्याचा वापर. या पद्धतीमध्ये कणसांचे शीतकरण थंड पाण्यामध्ये बुडवून किंवा थंड पाण्याचे फवारे मारून केले जाते. पाण्याचे तापमान सर्वसाधारण एक अंश सेल्सिअस असावे. अशा पाण्यामध्ये सुमारे 45 मिनिटे कणसे बुडवून ठेवावीत. यामुळे कणसांचे तापमान चार अंश सेल्सिअस या आवश्यक पातळीपर्यंत खाली आणता येते.

2) दुसरी शीतकरणाची पद्धत म्हणजे बर्फाचा वापर. ही सर्वात चांगली पद्धत आहे. स्थानिक बाजारासाठीसुद्धा ही पद्धत उपयुक्‍त आहे. जसे मासे बर्फामध्ये ठेवले जातात. त्याप्रमाणे खोल्यांमध्ये कणसांच्या भोवती बर्फ टाकावा. सर्वसाधारणपणे कणसे आणि बर्फाचे प्रमाण 5:1 असे ठेवावे.

प्रिकूलिंग केलेली कणसे शीत गृहामध्ये साठवून ठेवता येतात. शीतगृहाचे तापमान शून्य अंश से. आणि आर्द्रता 95 टक्के एवढी असावी. तथापि स्वीटकॉर्नची कणसे अधिक काळ शीतगृहामध्ये ठेवल्यास त्यांची गुणवत्ता कमी होते. म्हणून बाजाराच्या मागणीप्रमाणे विक्रीची व्यवस्था करणे लक्षात घ्यायला हवी. की, स्वीटकॉर्नच्या काढणीनंतर ते ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत ते सतत थंड ठेवायला हवे.

– सत्यजित दुर्वेकर

Back to top button