पर्याय उसातील आंतरपिकाचा | पुढारी

पर्याय उसातील आंतरपिकाचा

महाराष्ट्रात ऊस लागवड सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली हंगामामध्ये केली जाते. सुरू उसाची लागवड डिसेंबर ते फेबु्रवारी या कालावधीत केली जाते. सुरू उसाचा कालावधी 12-14 महिन्यांचा असतो.

उसाची लागवड केल्यानंतर पूर्ण उगवण होण्यासाठी 6-8 आठवड्यांचा कालावधी लागतो. सुरुवातीच्या कालावधीमध्ये उसाची वाढ हळू होत असल्यामुळे दोन सर्‍यांमध्ये आंतरपीक घेण्यासाठी भरपूर मोकळी जागा असते.
उसाच्या लागवडीवर झालेला बियाणे, खते आणि आंतर मशागतीसाठी केलेला खर्च आंतरपिकाच्या उत्पन्‍नातून निघून जातो. तणांचे नियंत्रण होते. सुरू उसामध्ये भुईमूग, सोयाबीन, कोबी, फुलकोबी, मेथी, कोथिंबीर आणि पट्ट्यांमध्ये कलिंगड, काकडी ही आंतरपिके घेता येतात. द्विदल वर्गातील आंतरपिके घेतल्यास जमिनीचा पोत सुधारतो. सुरू उसामध्ये आंतरपिकाची निवड करताना त्या आंतरपिकाच्या जमीन क्षेत्राच्या प्रमाणानुसार आंतरपिकाचे ‘बी’प्रमाण ठरवावे.

– जगदीश काळे

Back to top button