वांग्याची रोपे तयार करताय? | पुढारी

वांग्याची रोपे तयार करताय?

वांगे लागवडीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे रोपे तयार करणे होय. वांग्याची रोपे गादीवाफ्यावर तयार करतात. गादीवाफे 3—1 मीटर आकाराचे आणि 15 से.मी. उंचीचे करावेत. 1 हेक्टर लागवडीसाठी सरळ वाणाचे 350-400 ग्रॅम पुरेसे होते, तर संकरीत वाणाचे हेक्टरी 120 ते 150 ग्रॅम बियाणे पुरते. प्रती वाफ्यात 1 पाटी चांगले कुजलेले शेणखत आणि 120 ग्रॅम संयुक्‍त रासायनिक खत द्यावे. मर रोगाच्या नियंत्रणासाठी 30 ते 40 गॅॅॅ्रम ब्लायटॉक्स टाकावे. वाफे सपाट करून रुंदीस समांतर 10 से.मी. अंतरावर बोटाने 2 से.मी. खोलीच्या ओळी काढून त्यात बी पातळ पेरावे.

सुरुवातीस वाफ्यांना झारीने पाणी द्यावे. उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी प्रत्येक वाफ्यास 50 गॅ्रम युरिया खत आणि 20 गॅ्रम फोरेट औषध रोपाच्या 2 ओळींमध्ये काकरी पाडून द्यावे आणि हकले पाणी द्यावे. वाफे कीड आणि रोग नियंत्रणमुक्‍त ठेवावेत. त्यासाठी 10 दिवसांच्या अंतराने औषधांची फवारणी करावी. लागवणीपूर्वी रोपांना थोडा ताण द्यावा म्हणजे रोप कणखर होईल. लागवडीपूर्वी 1 दिवस रोपांना पाणी द्यावे. साधारणपणे 4 ते 6 आठवड्यांत रोपे लागवडीस तयार होतात.

   – सतीश जाधव

Back to top button