मळणी यंत्राची काळजी | पुढारी

मळणी यंत्राची काळजी

सुरुवातीला मळणी यंत्रामध्ये पीक न भरता चालू करून पाहावे. यावेळी पीक न भरता चालू करून पाहावे. यावेळी यंत्रातून काही अनावश्यक आवाज येतात का? पटट्यांना योग्य प्रमाणात ताण आहे किंवा नाही? चालू स्थितीत पट्टे निसटतात का, या गोष्टींकडे लक्ष द्यावे. याचप्रमाणे चालण्याची गती योग्य आहे का, पंखे व्यवस्थित फिरतात का, इत्यादी बाबी तपासून पाहाव्यात.

मळणी यंत्र चालवण्यासाठी त्याला ऑइल इंजिन, विद्युत मोटार, पावरट्रिलर यासारखे शक्‍ती स्रोत जोडता येतात. ते जोडताना मळणी यंत्रामधून बाहेर येणार्‍या काड्या आणि भुसा यापासून संरक्षण करण्याची योग्य काळजी घ्यावी. भुसा बाहेर टाकणारी बाजू वारा वाहण्याच्या दिशेला असावी. मळणी यंत्र समपातळी ठेवावे.

ऑईल इंजिन, टॅ्रक्टर किंवा पॉवरट्रिलरला धूर टाकणारा पाईप पिकाच्या ढिगाच्या दिशेने नसावा. त्यामधून बाहेर पडणार्‍या ठिणग्या आगीचे कारण बनू शकतात. मळणी यंत्रामध्ये योग्य प्रमाणात वाळवलेल्या पिकांची मळणी करावी. ओले पीक यंत्रामध्ये टाकल्यास यंत्रणावर जास्त ताण पडतो. पट्ट्यांचे घर्षण वाढते. त्यामुळे आगीचा धोकादेखील संभवतो. म्हणूनच मळणी यंत्राची योग्य काळजी घ्यावी.
– जगदीश काळे

हेही वाचलंत का? 

Back to top button