कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करताय? तर ही घ्या काळजी | पुढारी

कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करताय? तर ही घ्या काळजी

कुक्कुटपालन यशस्वी होण्यासाठी पहिल्यापासून व्यवस्थापनाची माहिती द्यावी. पोल्ट्री उद्योगातील यशस्वी उद्योजकांची समक्ष भेट घेऊन सविस्तार माहिती घ्यावी. थेट पोल्ट्री फार्मवर प्रशिक्षण घ्यावे. कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी खालील मुद्द्यांकडे लक्ष द्यावे.
खरेतर मांसासाठी आणि अंड्यांसाठी अशा दोन उद्देशांसाठी कुक्कुटपालन केले जाते. दोन्ही प्रकारांसाठी वेगवेगळ्या जातींची निवड करावी.

कोंबड्यांच्या घरामध्ये हवा नेहमी खेळती असावी. थंड किंवा गरम हवेचा झोत सरळ त्यांच्यावर येऊ देऊ नये. त्यांना नेहमी स्वच्छ पाणी द्यावे. अंडी देणार्‍या कोंबड्यांना 16 तास प्रकाश द्यावा. गादी पद्धतीमध्ये पाण्याच्या भांड्याची जागा दररोज बदलावी. त्याआधी भांडे ठेवलेली जागा उकरून काढावी. कोंबड्यांच्या घरातील लिटरमध्ये ओलावा नसावा. रक्ताच्या हगवणीचा आजार होत नाही.
खाद्याच्या भांड्याची उंची कोंबडीच्या पाठीच्या उंचीबरोबर असावी. नेहमी संतुलित आहार द्यावा, अंडी जास्त मिळतात.
मांसल कोंबड्याची वाढ लवकर होते. सहाव्या किंवा आठव्या आठवड्यात आणि शेवटी 16 व्या आठवड्यात पक्ष्यांची चोच कापावी, म्हणजे खाद्य वाया जात नाही.

अंडी उत्पादनासाठी व्हाईट लेगहॉर्न ही जात चांगली आहे. अंडी आणि मांस उत्पादनासाठी र्‍होड आयलंड रोड ही जात उत्तम आहे. असे असले तरी आपला भाग विचारात घेता तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या सल्ल्याने कोंबड्यांच्या जातींची निवड करावी. पक्ष्यांना वेळोवेळी लसीकरण करणे आवश्यक आहे.

– जयदीप नार्वेकर 

Back to top button