ढबू मिरची लागवड करताय? - पुढारी

ढबू मिरची लागवड करताय?

महाराष्ट्रात ढबू मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. ढबू मिरचीला दिवसाचे सरासरी तपमान 25 सेल्सिअस व रात्रीचे 14 सेल्सिअस या पिकास उत्तम तापमान असून तापमान 10 सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास व ठिपके पडल्यास या पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. ढबू मिरचीची लागवड ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करतात. त्यामुळे फळांची काढणी जानेवारी, फेब्रुवारी या कालावधीत करता येते. ढबू मिरचीला जमीन चांगली कसदार व सुपीक लागते. मध्यम ते भारी काळी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य आहे. नदीकाठच्या पोयट्याच्या सुपिक जमिनी लागवडीस योग्य आहेत. जमिनीचा सामू 6 ते 7 च्या दरम्यान असावा.

ढबू मिरचीची लागवड रोपे लावून करतात यासाठी एक किंवा दोन आर क्षेत्रावर रोपवाटिका करावी. जमीन चांगली उभी- आडवी नांगरून हेक्टरी 15 ते 20 टन शेणखत घालावे. पूर्वीच्या पिकांचे धसकटे गोळा करून दोन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. कॅलिफोर्निया वंडर या जातीचे झाड मध्यम उंचीचे उभट वाढणारे असून मिरची गर्द हिरव्या रंगाची असते. या मिरचीचे साल जाड असून फळांना तिखटपणा नसतो. ही उशिरा तयार होणारी जात असून हेक्टरी उत्पादन 12 ते 15 टन मिळते.

ढबू मिरची लागवड www.pudhari.news
ढबू मिरची लागवड

अर्का मोहिनी या जातीची फळे मोठी आणि हिरव्या गडद रंगाची असून फळाचे सरासरी वजन 80 ते 100 ग्रॅम असते. या जातीचे हेक्टरी उत्पादन 20 ते 25 टन असते. यलो वंडर, भारत आणि इंद्रा यांसारख्या ढबू मिरचीच्या संकरीत जाती लागवडीस योग्य आहेत. दर हेक्टरी 3 किलो बियाणे लागते. ढबू मिरचीला लागवडीपासून सुरुवातीच्या वाढीसाठी भरपूर व नियमित पाण्याची आवश्यकता असते. फुले व फळे लागताना नियमित पाणी द्यावे. सर्वसाधारपणे एक आठवड्याच्या अंतराने पाणी द्यावेे.

फळे हिरवीगार व संपूर्ण वाळलेली असल्यास फळांची काढणी करावी. त्यासाठी फळांच्या टोकांच्या वाळलेल्या स्त्री केसरांचा भाग गळून पडलेला असावा. फळे झाडावर जास्त काळ ठेवल्यास ती पिकतात. काही देशात लाल फळांना जास्त मागणी असते. परंतु, यामुळे पुढील फळांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो व उत्पादन कमी मिळते. फळे झाडावरून देठासहीत काढावीत. साधारणपणे दर 8 दिवसांनी फळांची काढणी करावी. अशा 4 ते 5 काढणीत सर्व पीक निघते. प्रतिहेक्टरी ढबू मिरचीचे 17 ते 20 टनांपर्यंत सरासरी उत्पादन मिळते.

ढबू मिरचीला लागवडीपासून सुरुवातीच्या वाढीसाठी भरपूर व नियमित पाण्याची आवश्यकता असते. फुले व फळे लागताना नियमित पाणी द्यावे. सर्वसाधारपणे एक आठवड्याचे अंतराने पाणी द्यावेे. फळे हिरवीगार व संपूर्ण वाळलेली असल्यास फळांची काढणी करावी. त्यासाठी फळांच्या टोकांच्या वाळलेल्या स्त्री केसरांचा भाग गळून पडलेला असावा.

– प्रसाद पाटील

Back to top button