घेवडा घ्या घेवडा... - पुढारी

घेवडा घ्या घेवडा...

महाराष्ट्रात पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक इत्यादी जिल्ह्यांमध्ये श्रावण घेवड्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 31,050 हेक्टर क्षेत्रावर श्रावण घेवड्याची लागवड होते. घेवड्याच्या कोवळ्या शेंगांची भाजी तसेच सुकलेल्या दाण्यांची उसळ लोकप्रिय आहे. घेवड्याच्या पानांचा उपयोग जनावरांच्या चार्‍यासाठी करता येतो. शेंगांमध्ये ‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्व तसेच खनिजे, लोह आणि चुना तसेच प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.

घेवडा

घेवडा पीक हलक्या ते मध्यम, पाण्याचा निचरा होणार्‍या जमिनीत उत्तम प्रकारे येते. अतिभारी जमिनीत झाडांची वाढ भरपूर होते. परंतु, शेंगा कमी लागतात. जमिनीचा सामु 5.5 ते 6 च्या दरम्यान असावा. घेवडा थंड हवामानात आणि पावसाळ्यात येणारे पीक असून, 15 ते 40 अंश सेल्सिअस तापमानात चांगले पीक येते. अतिथंडी व अतिउष्ण हवामान या पिकास मानवत नाही.

तीनही हंगामांत लागवड

महाराष्ट्रात या पिकाची लागवड तीनही हंगामांत होते. खरीप हंगामासाठी जून, जुलै महिन्यात, रब्बी हंगामासाठी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात आणि उन्हाळी हंगामात जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत घेवड्याची लागवड करतात. घेवड्याच्या कटेंडर, पुसा पार्वती, अर्का कोमल, व्ही.एल., 5 जंपा, पंत अनुपमा,फुले सुयश या प्रकारच्या जाती लागवडीयोग्य आहेत. प्रतिहेक्टरी 40 किलो बियाणे लागते. टोकण पद्धतीने लागवड केल्यास हेक्टरी 25 ते 30 किलो बी लागते. सर्वसाधारणपणे हेक्टरी 720 किलो बियाण्याचे आणि 630 किलो पाल्याचे उत्पादन देणार्‍या घेवड्याचे पीक जमिनीतून 66 किलो नत्र, 27 किलो स्फुरद आणि 55 किलो पालाश शोषून घेते.

– सत्यजित दुर्वेकर

हेही वाचालत का? 

 

Back to top button