कुमारी कंदम ही भारताच्या दक्षिणेकडील हिंदी महासागरात लोप पावलेली तामिळ संस्कृती होती. हे द्वीप कुमारीनाडू या नावानेही ओळखले जाते. या प्राचीन बेटावर तामिळ संस्कृती नांदत होती.
जगामध्ये काळाच्या ओघात किंवा वातावरण बदलामुळे अनेक प्राचीन संस्कृती समुद्रात बुडून नामशेष झाल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे. भारतीय उपमहाद्वीपामध्ये श्रीकृष्णाची द्वारकाही पाण्याखाली गेल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे. अशी अनेक शहरे भौगोलिक बदलांमुळेही गाडली गेली होती. प्राचीन काळच्या कोल्हापूरचे अनेक अवशेष ब्रह्मपुरी टेकडीच्या उत्खननात सापडले होते. ते सापडल्यानंतर प्राचीन करवीरचा – कोल्हापूरचा शोध लागला होता. भारतातील अशीच एक संस्कृती काळाच्या ओघात लुप्त झाली आहे, असे इतिहासाच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. ही संस्कृती प्राचीन काळात एका महाद्वीपावर वसलेली होती. सध्याच्या काळात ग्लोबल वार्मिंगमुळे पृथ्वीवर भयंकर आणि विनाशकारी बदल घडून येत आहेत. पण असे हे बदल आदिम काळापासून होत आलेले आहेत. असाच काहीसा प्रकार होऊन प्राचीन काळात होऊन लेमुरीया नावाचे महाद्वीप समुद्राच्या तळाशी गेले होते. फिलिप स्क्लेटर या भूगर्भ शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार याच महाद्वीपावर मानवाची उत्पत्ती झाली होती. सध्या या विषयावर संशोधन सुरू आहे. लेमुरीया आणि कुमारी कंदम ही दोन्ही महाद्वीपे एकच आहेत, असे तामिळ इतिहासकार म्हणतात.
तामिळ इतिहासकारांच्या म्हणण्याचा दाखला दिला, तर या द्वीपाचे नाव कुमारी कंदम असे होते. कुमारी कंदम ही भारताच्या दक्षिणेकडील हिंदी महासागरात लोप पावलेली तामिळ संस्कृती होती. हे द्वीप कुमारीनाडू या नावानेही ओळखले जाते. या प्राचीन बेटावर तामिळ संस्कृती नांदत होती. आजच्या मानव संस्कृतीचा उदय तिथूनच झाला, असे मानले जाते.
अमेरिकन आणि युरोपियन शास्त्रज्ञांनी 19 व्या शतकात आफ्रिका, भारत आणि मादागास्कर येथे भूवैज्ञानिक आणि इतर साम्य शोधण्यासाठी या सर्वांचे मूळ म्हणजे समुद्रात बुडालेले महाद्वीप असावे, असा सिद्धांत मांडला. या लोप पावलेल्या द्वीपाला त्यांनी लेमुरीया हे नाव दिले. या महाद्वीपाचा उल्लेख प्राचीन तामिळ, संस्कृत ग्रंथ आणि साहित्यातूनही आढळून येतो. यातील प्राचीन नोंदींच्या संदर्भानुसार हे महाद्वीप म्हणजे कुमारी कंदम आहे, असे तामिळ इतिहासकारांचे म्हणणे आहे.
कुमारी कंदम पाण्याखाली बुडाले, तेव्हा 7 हजार मैल एवढा भूभाग असलेले क्षेत्र 49 तुकड्यांमध्ये विभागले गेले. अशाप्रकारे हे महाद्वीप हिमयुगाच्या शेवटी समुद्रात बुडाले तेव्हा तिथल्या लोकांनी जगातील वेगवेगळ्या भागांत आश्रय घेतला आणि जगात युरोप, आफ्रिका, भारत, इजिप्त, चीन येथील संस्कृतीचा विकास झाला असे म्हटले जाते. मादागास्कर व भारतात मोठ्या प्रमाणात वानरांचे जीवाश्म आढळून आल्यानंतर या ठिकाणी एक प्राचीन संस्कृती नांदत असावी, असा तर्क फिलिप स्क्लेटर यांनी काढला होता. या संस्कृतीला 1903 मध्ये व्ही. जी. सूर्यकुमार यांनी सर्वप्रथम कुमारी कंदम हे नाव दिले. एका मोठ्या नैसर्गिक आपत्तीमुळे ही संसक्ती पाण्याखाली बुडाली, असे त्यांचे मत आहे. लेमुरीयाविषयी माहिती देणारे शास्त्रज्ञ प्राचीन संस्कृतीचा शोध घेत भारतात आले, तेव्हा भारतीय लोकगीतांमध्ये त्यांना इतिहासाबरोबरच लुप्त झालेल्या त्या प्राचीन संस्कृतीचेही वर्णन आढळते. त्याच आधारावर त्यांनी देखील कुमारी कंदम आणि त्यांच्या तर्कातील लेमुरीया बेट एकच असू शकते हे मान्य केले
कुमारी कंदमचे राजा पांडियन हे संपूर्ण भारतीय महाद्वीपाचे राज्यकर्ते होते, असे संशोधक म्हणतात. तेथे वास्तव्य करणारी तामिळ संस्कृती ही जगातील सर्वात जुनी संस्कृती आहे, असे शास्त्रज्ञ मानतात. कुमारी कंदमचा संबंध अनेक संशोधक रावणाच्या लंकेशी जोडतात. भारत आणि श्रीलंका यांना जोडणार्या दगड आणि मातीच्या या रामसेतूचे बांधकाम श्रीरामांच्या देखरेखीखाली नल आणि नील या वानर बांधकाम तज्ज्ञांनी लंकेत जाण्यासाठी केले होते.
जमिनीच्या या खंडाकडे नैसर्गिक रूपात पाहिल्यास असे लक्षात येते की, हा महासागरामध्ये बुडालेला आणि नंतर एक तुटलेला पूल आहे. सुमारे 14 हजार 500 वर्षांपूर्वी समुद्राची पातळी ही आजच्यापेक्षा 100 मीटर खाली होती, तर 10 हजार वर्षांपूर्वी 60 मीटर खाली होती असा भारताच्या राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्थेच्या संशोधकांचा निष्कर्ष आहे. त्यामुळे ही गोष्ट खरी असू शकते की भारतातून श्रीलंकेत जाण्यासाठी एक पूल असावा. हा पूल रामसेतू आहे, असे आपण मानतो. गेल्या 10 ते 12 हजार वर्षांत समुद्राच्या वाढणार्या पातळीने वारंवार सुनामी आणि आलेल्या महापुराने आसपासचा परिसर आपल्यात सामावून घेतला. अशाच एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे हे महाद्वीप बुडाले असावे!
कुमारी कंदम म्हणजे निव्वळ दंतकथा आहे आणि या आख्यायिकेत काही तथ्य नसल्याचे आधुनिक जगाचे मत आहे. परंतु या विषयाशी निगडित संदर्भ, पुरावे हे तर नव्याने अभ्यास होण्याची आवश्यकता दर्शवतात. मुख्य म्हणजे भारत-श्रीलंका या देशांना जोडणार्या प्राचीन पुलाचे अस्तित्व कुमारी कंदमविषयी संशोधकांनी व इतिहासकारांनी नव्याने अभ्यास करून त्याची उकल करावी, असे दर्शवते. असे झाले तरच कुमारी कंदमचा लोप पावलेला इतिहास जगासमोर येईल. अन्यथा कुमारी कंदम हे केवळ एक दंतकथाच बनून राहील.
तर या विचारवंताने जलसमाधी मिळालेल्या अटलांटिस शहराविषयी सिद्धांत मांडला होता. त्याच्या मते समुद्राखाली एक असे शहर दडलेले आहे, जे फार प्राचीन आणि प्रगत होते. प्राचीन काळातील ग्रीक विचारवंत प्लेटो याने समुद्राखाली बुडून गेलेल्या अटलांटिस या प्राचीन शहराविषयीचा आणि लोप पावलेल्या संस्कृतीविषयीचा सिद्धांत मांडला होता, तेव्हा त्याला लोकांनी वेड्यात काढले होते. पण कालांतराने त्याचा हाच सिद्धांत खरा ठरला आणि अटलांटिस शहराचा शोध लागला. म्हणूनच भारतीय उपमहाद्वीप समूहामध्येही अशाच प्रकारची लोप पावलेली संस्कृती आहे आणि ती शोधावी, असे तामिळ इतिहासकारांचे म्हणणे आहे.