श्रावण महिन्यात (Shravan Month) भगवान महादेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. शिव मंत्राचे जप केल्याने पूर्ण जीवनभर वाईट ग्रहांचा प्रभाव कमी होतो अशी मान्यता आहे. श्रावण महिन्यातील सोमवारचे व्रत केल्याने आणि शिवलिंगाला जलाभिषेक केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात. श्रावण महिना (Shravan Somvar) भगवान शिवाचा सर्वांत प्रिय महिना मानला गेला आहे. या महिन्यात तुम्ही श्रद्धा, भक्तिभाव आणि मनापासून शिवपूजा केली तर तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. जाणून घेऊ अशा कोणत्या राशी आहेत, ज्यांवर या पवित्र महिन्यात भोलेनाथांची विशेष कृपा असेल.
मेष राशीच्या लोकांना श्रावण महिना अत्यंत भाग्याचा ठरणार आहे. या संपूर्ण महिन्यात तुमच्यावार भगवान भोलेनाथांची कृपा राहील. धनलाभाच्या सुवर्ण संधी प्राप्त होतील, आणि दीर्घकाळापासून थकलेली कामे मार्गी लागतील. नशिबाची साथ मिळाल्याने प्रगतीच्या आणि धनलाभाच्या संधी मिळतील. नोकरदार व्यक्तींना नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील. पूर्ण महिना तुम्हाला चांगला नफा पाहायला मिळेल.
सिंह राशीच्या लोकांना यंदा श्रावण महिना अतिशय खास असणार आहे. या महिन्यात तुमच्या जीवनात आनंदी वातावरण राहील. लाभाच्या चांगल्या संधी प्राप्त होतील. तुम्हाला करिअरमध्ये चांगले लाभ होतील आणि करिअरमध्ये नवी उंची गाठाल. या महिन्यात भगवान महादेवांची तुमच्यावर विशेष कृपा राहील. सुखसुविधांत वाढ होईल, तसेच व्यापारात तुम्ही चांगला नफा मिळवाल.
मकर राशीच्या लोकांना श्रावण महिन्यात विशेष संधी मिळतील. भगवान भोलेनाथांच्या कृपेने या महिन्यात तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील. जमीन, संपत्ती यासंबंधीत विषयांत तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला नशिबाची चांगली साथ राहील, त्यामुळे तुम्हाला पैसे मिळवण्याच्या विविध संधी मिळतील आणि सुखसुविधांत वाढ होईल. प्रकृती चांगली असेलआणि सुखशांती राहील.
धनू राशीच्या लोकांना श्रावण महिना अत्यंत शुभ आणि चांगला सिद्ध होईल. तुमच्या सर्व कामांत गती येईल आणि तुम्हाला तुमच्या कामात यश येईल. थकलेले पैसे हाती येतील, त्यातून रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरदार लोकांना हा महिना वरदान ठरेल. तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होतील, तसेच तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
कुंभ राशीच्या लोकांना श्रावण शिवरात्रीतला जीवनात यश मिळेल. वडिलांचे सहकार्य मिळेल, तसेच सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना शुभवार्ता मिळेल. शिक्षण आणि स्पर्धेशी संबंधित लोकांना श्रावण महिना शुभवार्ता घेऊन येईल. जे लोक त्यांच्या क्षेत्रात संघर्ष करत आहेत, भगवान भोलेनाथांच्या कृपेने अनुकूल वातावरण निर्माण होईल.