Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.
मेष : आज कोणतेही काम करण्यापूर्वी नियोजन करणे महत्त्वपूर्ण असेल. यामुळे कामातील चुका टाळता येतील. मुलांच्या करिअरशी संबंधित प्रश्न मार्गी लागल्याने दिलासा मिळेल. सोशल मीडियावर आणि निष्कारण चर्चेमध्ये वेळ वाया घालवल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. संतुलित आहारासोबत व्यायामाकडेही लक्ष द्या.
वृषभ : तुम्ही आज तुमच्या क्षमता आणि प्रतिभेच्या जोरावर प्रत्येक परिस्थितीचा सामना करू शकाल. विशेषतः महिला वर्गासाठी काळ अनुकूल राहील. अज्ञातांवर विश्वास ठेवल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता. काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा समतोल राखणे आव्हानात्मक असेल. व्यवसायात तुमच्या संपर्कातील व्यक्तीशी मधुर संबंध ठेवा.
मिथुन : आज तुमच्या बौद्धिक क्षमतेमुळे तुम्ही सकारात्मक परिणाम प्राप्त कराल. प्रलंबित आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. बेकायदेशीर कामांपासून दूर राहा. विद्यार्थ्यांनीही करमणूक आणि चुकीच्या कामात गुंतून करिअरशी तडजोड करू नये. नोकरदार लोकांवर आज कामाची अतिरिक्त जबाबदारी असेल. कौटुंबिक परिस्थिती आनंदी राहील. रक्तदाबाशी संबंधित समस्या वाढू शकतात.
कर्क : कुटुंबात शिस्तीचे वातावरण राहील. वैयक्तिक हितसंबंधांवर तसेच तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. असे केल्याने तुमच्यात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. कुटुंबातील सदस्याच्या वैवाहिक जीवनातील मतभेदामुळे घरात तणावाचे वातावरण राहील. पैशाच्या बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. व्यवसायात जनतेशी संबंधित नाते अधिक घट्ट करा. घरातील वातावरण आनंदी राहील.
सिंह : आज काही काळापासून सुरू असलेल्या समस्या सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मित्रांच्या सहवासात वेळ चांगला जाईल. विद्यार्थी आणि तरुणांना स्पर्धेचा निकाल त्यांच्या बाजूने मिळू शकतो. विनाकारण कोणाशीही वाद घालू नका. रागावर नियंत्रण ठेवा. व्यापार-व्यवसायात परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल.
कन्या : कुटुंबातील ज्येष्ठांशी दयाळूपणे वागणे तुमच्यासाठी भाग्यकारक ठरेल. इतरांवर जास्त विश्वास ठेवणे तुमच्यासाठी हानिकारक ठरेल. भविष्यातील कोणतीही योजना बनवताना तुमच्या निर्णयाला प्राधान्य द्या. तुमचे व्यवस्थापन आणि कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांशी योग्य संबंध यामुळे कामाचा वेग वाढेल. बाहेरच्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे घरात थोडेसे नकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते.
तूळ : करमणुकीशी संबंधित कामांमध्ये वेळ जाईल. वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेबाबत वाद सोडविण्यास प्राधान्य द्या. तुम्हाला सर्जनशील कामांमध्येही रस असेल. आपली दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा निष्काळजीपणामुळे महत्त्वाचे काम चुकू शकते. मुलांच्या संगतीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
वृश्चिक : आज तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. बदलत्या वातावरणामुळे तुम्ही तुमच्या कामात केलेले बदल फलदायी ठरतील. आर्थिक गुंतवणुकीसंदर्भातील निर्णय योग्य राहतील. पैसे उधार घेण्याशी संबंधित व्यवहार करू नका. घरच्या कारभारात जास्त ढवळाढवळ करणे योग्य नाही. योजना बनवण्याबरोबरच त्या सुरू करणेही महत्त्वाचे आहे. नोकरदारांना दिवस अनुकूल आहे.
धनु : आत्मविश्वासाच्या जोरावर विशिष्ट ध्येय साध्य करू शकाल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी झालेल्या भेटीमुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. नवीन योजनांचा गांभीर्याने विचार करा. भावनेच्या आहारी जावून निर्णय घेतल्याने एखादी नकारात्मक गोष्टही तुम्हाला त्रास देऊ शकते. खूप घाईमुळे कोणतेही काम बिघडू शकते. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी झालेली भेट व्यावसायिक बाबतीत उपयुक्त ठरेल.
मकर : तुम्ही तुमच्या दैनंदिन कामांबरोबच नवीन गोष्टी शिकण्याला प्राधान्य द्याल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल. मत्सरामुळे काही लोक तुम्हाला भावनिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करतील. कोणत्याही विषयावर निर्णय घेताना घरातील अनुभवी आणि विशेष लोकांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका.
कुंभ : आज घरगुती सुखसोयींसाठी खरेदी करण्यात कुटुंबासोबत वेळ व्यतित कराल. अध्यात्माशी संबंधित कामांमध्ये विशेष रुची राहील. वारसाशी संबंधित प्रलंबित प्रकरण सोडवण्याची हीच योग्य वेळ आहे. मित्रांसोबतचे संबंध खराब करू नका. मानसिक शांती मिळवण्यासाठी धार्मिक ठिकाणी थोडा वेळ घालवा. कार्यक्षेत्रात घाई न करता गांभीर्याने आणि सावधगिरीने काम करण्याची गरज आहे.
मीन : आज मुलांना त्यांच्या करिअर संदर्भात चांगली बातमी मिळाल्याने आनंद होईल. जवळच्या नातेवाईकांसोबत महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होईल. लाभदायक प्रवासाचाही योग आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. काहीवेळा विनाकारण तुम्हाला तणाव जाणवेल. निसर्गात थोडा वेळ व्यतित करा.