Horoscope Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | रविवार, २२ सप्‍टेंबर २०२४

जाणून घ्या आजचे राशिभविष्य
Horoscope Today
जाणून घ्या तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? | File Photo
Published on
Updated on

Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.

मेष : आज इच्छित कार्य पूर्ण झाल्याने मनशांती लाभेल

Daily Horoscope
मेष File Photo

मेष : श्रीगणेश सांगतात की, आज इच्छित कार्य पूर्ण झाल्याने मनशांती लाभेल. तुमचे काम प्रामाणिकपणे करा, अन्‍यथा तुम्ही कायदेशीर अडचणीत सापडू शकता. वाहतूक नियमांचे उल्लंघन हानिकारक ठरेल. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता, उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात, कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. अतिकामाचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होवू शकतो.

वृषभ : भविष्यातील ध्येयावर लक्ष केंद्रित करा

Daily Horoscope
वृषभFile Photo

वृषभ : श्रीगणेश सांगतात की, भविष्यातील ध्येयावर लक्ष केंद्रित करा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कराल. लोकांची चिंता न करता स्‍वकार्यावर लक्ष केंद्रित केल्यास तुम्हाला यश मिळेल. महत्त्वाचे करार होण्‍याची शक्‍यता. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. घशात इन्फेक्शनची समस्या जाणवेल.

मिथुन : वैवाहिक जीवन सामान्य राहील

Daily Horoscope
मिथुनFile Photo

मिथुन : श्रीगणेश म्‍हणतात की, तुमच्या सकारात्मक आणि संतुलित विचाराने काही काळापासून सुरू असलेल्या समस्या नक्कीच सुटतील. भावांसोबत सुरु असलेले वाद शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. न्‍यायालय प्रकरण सुरु असेल तर निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. व्यवसायासंबंधी तुमच्या भविष्यातील योजना सध्या टाळा. वैवाहिक जीवन सामान्य राहील. तणाव आणि चिंता यामुळे निद्रानाश सारख्या तक्रारी उद्भवू शकतात.

कर्क : वैयक्तिक बाबी बाहेरील लोकांसमोर उघड करू नका

Daily Horoscope
कर्कFile Photo

कर्क : श्रीगणेश सांगतात की, आज तरुण ध्‍येयपूर्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. अशक्य कार्य अचानक पूर्ण केल्याने समाधान लाभेल; परंतु आपल्या वैयक्तिक बाबी बाहेरील लोकांसमोर उघड करू नका. कुटुंबातील सुविधांवर खर्च करताना तुमच्या बजेटकडे लक्ष द्या. शेजाऱ्यांशी काही प्रकारचे भांडण किंवा वाद होऊ शकतो. घरातील काही समस्यांमुळे पती-पत्नीच्या नात्यात तणाव निर्माण होईल. रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.

सिंह : अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करुन कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले

Daily Horoscope
सिंहFile Photo

सिंह : श्रीगणेश सांगतात की, मुलांचे शिक्षण आणि करिअरशी संबंधित काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कुटुंबात काही काळापासून सुरू असलेली बेशिस्‍त दूर करण्यासाठी महत्त्वाचे नियम बनवाल. कुणाशीही वाद घालू नका, अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करुन आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले होईल. सध्याच्या व्यवसायाव्यतिरिक्त इतर क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करा. पती-पत्नी परस्पर तडजोडीने कुटुंबाचे योग्य व्यवस्थापन कराल.

कन्या : तरुणांना त्यांच्या मेहनतीनुसार योग्य फळ मिळेल

Daily Horoscope
कन्याFile Photo

कन्या : श्रीगणेश सांगतात की, तरुणांना त्यांच्या मेहनतीनुसार योग्य फळ मिळाल्याने हायसे वाटेल. ज्येष्ठांच्या सल्ल्याने मार्गदर्शनाचे पालन केल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर पडेल. झटपट यश मिळवण्याच्या इच्छेने कोणतेही अनुचित काम करू नका. मुलांचे मनोबल टिकवण्यासाठी मार्गदर्शनही आवश्यक आहे. कुटुंबाची काळजी घेण्यासाठी वेळ काढावा. खोकला, सर्दी, ताप यांसारख्या ऋतुमानाच्या समस्या असतील.

तूळ : आज तुमची महत्त्वाच्या लोकांबरोबर चर्चा होईल

Daily Horoscope
तूळ File Photo

तूळ : श्रीगणेश सांगतात की, आज तुमची महत्त्वाच्या लोकांबरोबर चर्चा होईल. यातून काही नवीन गोष्टी शिकण्याची संधी देखील मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्याही चांगल्या प्रकारे पार पाडाल. नवीन काम सुरू करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्लाही घ्यावा. व्यवहारात अहंकार येऊ देऊ नका. व्यावसायिक क्षेत्रात बाहेरच्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. कुटुंबासोबत आनंदाने वेळ जाईल.

वृश्चिक : कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल

Daily Horoscope
वृश्चिकFile Photo

वृश्चिक : आजचा दिवस फलदायी आहे. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे, असे श्रीगणेश सांगतात. तुमच्‍या मेहनतीला यश येईल. जवळच्या नात्यांमध्ये काही काळ सुरू असलेले वाद मिटतील. मार्केटिंगशी संबंधित कामात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येईल.

धनु : आत्मविश्वासाने आणि सावधगिरीने बहुतेक कामे सहज पूर्ण होतील

Daily Horoscope
धनुFile Photo

धनु : आत्मविश्वासाने आणि सावधगिरीने बहुतेक कामे सहज पूर्ण होतील, असे श्रीगणेश सांगतात. कामाच्‍या व्‍यवस्‍ततेमधून स्‍वत:साठी वेळ काढाल. कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णयही घ्यावे लागतील. इतरांच्‍या जबाबदारी डोक्यावर घेतल्याने त्रास होईल. तुमच्या क्षमतेनुसार काम करा. विद्यार्थ्यांनी निरुपयोगी कामात गुंतून करिअरकडे दुर्लक्ष करु नका. कार्यक्षेत्रात काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल.

मकर : नातेवाइकांशी सुरू असलेले मतभेद दूर होती

Daily Horoscope
मकरFile Photo

मकर : श्रीगणेश सांगतात की, जवळच्या नातेवाइकांशी सुरू असलेले मतभेद दूर होतील. नोकरीशी संबंधित मुलाखतीत यश मिळेल. कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. प्रिय मित्राबाबत अप्रिय माहिती मिळाल्याने मन अस्वस्थ होईल. कार्यक्षेत्रात मनाप्रमाणे काम होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

कुंभ : नकारात्मक सवयी सोडण्याचा संकल्प करा

Daily Horoscope
कुंभFile Photo

कुंभ : जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित काही कामे पूर्ण होतील, असे श्रीगणेश सांगतात. सामाजिक कार्यात तुमचे योगदान तुम्हाला मानसिक शांती देईल. कोणत्याही नकारात्मक सवयी सोडण्याचा संकल्प करा. कोणतीही योजना राबविण्यापूर्वी नीट विचार करावा. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे योग्‍य ठरेल. एखाद्याच्या चुकीवर राग व्यक्त करण्याऐवजी शांतपणे निर्णय घ्‍या. व्यवसायिक कामे सामान्य राहतील. कुटुंबासोबत मनोरंजनाच्या कामातही वेळ जाईल.

मीन : वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणत्याही कामात धोका पत्करू नका

Daily Horoscope
मीनFile Photo

मीन : श्रीगणेश सांगतात की, आज तुमच्‍या संपर्क क्षेत्रात वाढ होईल. एखाद्या विशिष्ट कामाशी संबंधित योजना या आठवड्यात कार्यान्वित होतील. घराच्या देखभालीशी संबंधित काही योजना असतील. जवळच्या नातेवाईकांशी गैरसमज टाळा अन्‍यथा संबंध बिघडू शकतात. वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणत्याही कामात धोका पत्करू नका.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news