Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.
मेष : श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही काहीतरी विशेष साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम कराल. ऑनलाईन खरेदीही कराल. एखाद्या प्रिय व्यक्तीला अडचणीत मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. नकारात्मक वृत्तीच्या लोकांपासून दूर रहा; अन्यथा, तुमची बदनामी होवू शकते. अचानक काही खर्चाचे प्रसंगी येतील. कोणताही निर्णय घेण्यात अडचण येत असेल तर कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.
वृषभ : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही महत्त्वपूर्ण निर्णय घ्याल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्यही तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. अतिआत्मविश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकतो. परिस्थिती शांतपणे हाताळा. संवाद साधताना नकारात्मक शब्द वापरू नका. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल नाही. व्यवसायिक कामे सामान्य राहतील. वैवाहिक जीवन आणि कुटुंबासाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे.
मिथुन : श्रीगणेश म्हणतात की, आज घाई करण्याऐवजी शांतपणे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सर्व कामे योग्य प्रकारे पूर्ण होतील. तुमची चांगली वृत्ती आणि संतुलित विचारसरणी तुम्हाला समस्या सोडवण्यास मदत करेल. जास्त विचार केल्याने हात निसरडे होऊ शकतात हे लक्षात ठेवा. त्यामुळे नियोजनाबरोबरच त्याची सुरुवातही होणे गरजेचे आहे. अहंकारी असणे किंवा स्वतःला श्रेष्ठ समजणे योग्य नाही. मार्केटिंगची कामे पूर्ण करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.
कर्क : श्रीगणेश म्हणतात की, आज सकारात्मक कामात वेळ व्यतित केल्याने तुम्हाला मनःशांती लाभेल. तरुणाई त्यांच्या अभ्यास आणि करिअरकडे पूर्ण लक्ष देतील. इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देवू नका. मनात नकारात्मक विचार येतील. संयम आणि चिकाटी ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य राहील व कामात प्रगती होईल.
सिंह : श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस विशेषतः आरामदायी असेल. नवीन योजना आखल्या जातील. तुमचा इतरांवर प्रभाव पडेल. अतिकामाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. भूतकळात अडकू नका, वर्तमानात जगायला शिका. कोणतेही काम घाई न करता सहजतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव कायम राहील. कामाचा ताण जास्त असल्याने कुटुंबासोबत वेळ घालवल्याने वातावरण प्रसन्न राहील. आरोग्य चांगले राहील.
कन्या : श्रीगणेश म्हणतात की, ग्रहस्थिती अनुकूल आहे. तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. . गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दिनचर्येत सकारात्मक बदल होईल. सामाजिक कार्यातही सहभागी व्हाल. मुलांच्या प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण होईल. कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा. आळशीपणा किंवा निष्कारण चर्चेमुळे वेळ वाया जाऊ शकतो. व्यवसायात सुधारणा होऊ शकते. वैवाहिक जीवनात नाते मधुर होईल.
तूळ : श्रीगणेश सांगतात की, आज कठोर परिश्रमातून यश मिळेल. कौटुंबिक बाबींमध्ये तुमचा निर्णय महत्त्वाचा ठरेल. भावांसोबत कोणत्याही प्रकारचा वाद टाळा. अतिश्रम तुमच्यासाठी हानिकारक ठरतील. काही लोक तुमचा स्वार्थासाठी वापर करू शकतात. तुम्हाला तुमच्या कामाच्या शैलीत काही बदल करावे लागतील. कुटुंबासोबत खरेदीत वेळ जाईल.
वृश्चिक : श्रीगणेश सांगतात की, काही जुने मतभेद आज दूर होतील. महत्त्वाचे काम पूर्ण करू शकाल. मुलांशी संबंधित कोणत्याही समस्येवर उपाय शोधल्यास आराम मिळेल. स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडा. वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात परिश्रम जास्त आणि नफा कमी अशी परिस्थिती उद्भवू शकते.
धनु : श्रीगणेश म्हणतात की, आज आत्मपरीक्षण करा. हस्तांतरणाची कोणतीही योजना असल्यास योग्य वेळ आहे. मित्रासोबत सहलीचा बेत आखाल. इतरांच्या कामात ढवळाढवळ करु नका. जवळच्या व्यक्तीशी वाद घालणे देखील घराच्या व्यवस्थेवर नकारात्मक परिणाम करेल. व्यवसायात काही अडथळे येऊ शकतात.
मकर : श्रीगणेश सांगतात की, आज ग्रहमान अनुकूल आहे. मुलांवर जास्त बंधने घालू नका, त्यामुळे त्यांचे मनोबल कमी होऊ शकते. नकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडू देऊ नका. कार्यक्षेत्रात सर्व कामे स्वतः व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ व्यतित करा.
कुंभ : श्रीगणेश म्हणतात की, तुम्ही केलेल्या कोणत्याही चांगल्या कामामुळे तुम्हाला समाजात सन्मान मिळेल. महत्त्वाच्या कामात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्याचा गांभीर्याने विचार करा, परिस्थिती अनुकूल आहे. सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करून तुम्ही स्वतःला दुखवू शकता. व्यवसायासोबतच काही नवीन कामातही तुमची रुची वाढेल.
मीन : श्रीगणेश सांगतात की, आत्मविश्वासाने आणि समजुतीने संकटाचा सामना करू शकता. कोणत्याही प्रकल्पातील अपयशाने विद्यार्थी निराश होतील; पण नाउमेद न होता पुन्हा प्रयत्न करा. घरामध्ये सुधारणा करण्यापूर्वी तुमच्या बजेटचा विचार करा. कामाचा ताण जास्त असल्याने घर आणि कुटुंबासाठी थोडा वेळ काढणे गरजेचे आहे.