

Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.
मेष : श्रीगणेश सांगतात की, आज ग्रहमान तुमच्यासाठी अनुकूल आहे. संततीच्या करिअरच्या दृष्टीने लाभदायक योजना फलद्रूप होईल. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल. सामाजिक कार्यात व्यस्त राहाल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. नवीन काम सुरू होईल. पती-पत्नीमध्ये चांगला संवाद साधता येईल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
वृषभ : श्रीगणेश म्हणतात की, आज तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होईल. नवीन कामांचे नियोजन केले जाईल. आत्म-विश्लेषणाद्वारे आपले व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करा. विमा संबंधित कामात अधिक यश मिळेल. पती-पत्नीच्या नात्यात मतभेद होवू शकतात. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन : श्रीगणेश सांगतात की, मागील काही दिवसांपासून सुरु असलेला ताणतणाव आज दूर होऊ शकतो. कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. मुलाच्या करिअर संदर्भात सकारात्मक माहिती मिळाल्याने घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. आज आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबातील सदस्यांची समर्पणाची भावना घरातील वातावरण आनंदी ठेवेल. नकारात्मक विचार टाळा.
कर्क : आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस उत्तम आहे, असे श्रीगणेश सांगतात. तुम्ही सकारात्मक विचाराने प्रत्येक समस्येवर उपाय शोधाल. आध्यात्मिक कार्यात वेळ व्यतित केल्याने मनःशांती लाभेल. आज कार्यक्षेत्रात तुमचा उत्साह कमालीचा असेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राखाल. काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्याच्या समस्यांमध्ये सुधारणा होऊ शकते.
सिंह : श्रीगणेश म्हणतात की, आज नातेवाईक आणि शेजार्यांशी संबंध सुधारतील. तुम्हाला मनःशांती मिळेल. राग आणि हट्टीपणा यासारख्या नकारात्मक गोष्टीमुळे नुकसान होवू शकते, याची जाणीव ठेवा. पती-पत्नीमध्ये भांडण होऊ शकते. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कन्या : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. तुमच्या ध्येयासाठी समर्पित असाल. चुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पती-पत्नींना विपरीत परिस्थितीत पूर्ण सहकार्य मिळू शकते. काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्याशी संबंधित समस्येपासून आराम मिळेल.
तूळ : श्रीगणेश म्हणतात की, आज काही वेण आत्मपरीक्षण केल्यास दैनंदिन त्रासातून सुटका मिळेल. कुटुंबाच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारात परिस्थिती सामान्य राहील. घरात आनंदी आणि शांतीपूर्ण वातावरण असू शकते. घसादुखीचा त्रास जावणवले.
वृश्चिक : श्रीगणेश म्हणतात की, आज आर्थिक व्यवहारांकडे लक्ष देणे तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. घराच्या देखभालीच्या कामात योग्य वेळ घालवता येईल. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा. व्यवसायाच्या ठिकाणी आपली उपस्थिती आवश्यक असेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल.
धनु : श्रीगणेश सांगतात की, आज सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवल्याने तुमच्या सामाजिक सीमा वाढतील. तुम्हाला भावनिकदृष्ट्या सशक्त वाटेल. आपल्या बुद्धिमत्तेने आणि विवेकबुद्धीने सर्व समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात अपेक्षित परिणाम मिळू शकतो. पती-पत्नीचे नाते मधुर राहिल. कामाचा ताण घेवू नका.
मकर : श्रीगणेश सांगतात की, कोणत्याही प्रकारच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आजचा काळ उत्तम आहे. गेल्या काही वर्षांपासून तुम्ही नियोजित उद्दिष्टे साध्य करण्याची हीच वेळ आहे. तुमच्या औदार्याचा गैरवापर होऊ शकतो याची जाणीव ठेवा. आर्थिकदृष्ट्या अडचण येऊ शकते. एखाद्याशी संपर्क प्रस्थापित करताना काळजी घ्या. आरोग्य चांगले राहील.
कुंभ : श्रीगणेश म्हणतात की, आजचा दिवस आर्थिक निर्णयासाठी महत्त्वपूर्ण आहे. कोणत्याही प्रकारचे वाद टाळा, अन्यथा बदनामीला सामोरे जावे लागले. कौटुंबिक जबाबदार्या सक्षमपणे हाताळाल. व्यवसायातील सर्व कामे मार्गी लागतील. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. पोटविकारकडे दुर्लक्ष करु नका.
मीन : श्रीगणेश सांगतात की, आज अनेक अडथळ्यांवर मात करत महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. सकारात्मक लोकांसोबत थोडा वेळ व्यतित केल्याने तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप आराम वाटेल. बाहेरील व्यक्तीमुळे जोडीदाराबाबत गैरसमज होण्याची शक्यता. प्रकृतीची काळजी घ्या.