

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : तुमच्या तणावावर मात करू शकाल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. प्रेमामुळे सर्व काही ठीक होईल.
वृषभ : आज तुम्हाला आपले पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही. कारण, घरातील कुणी मोठी व्यक्ती तुम्हाला पैसे देऊ शकतात. तुम्ही लक्ष देण्याची अपेक्षा मुलं करतील.
मिथुन : इतरांना आपल्यासाठी काही करावयास भाग पाडू नका. इतरांच्या आवडी-निवडी, गरजांचा विचार करा, त्याने तुम्हाला अमर्याद आनंद मिळेल.
कर्क : आजच्या दिवशी धनहानी होण्याची शक्यता आहे. म्हणून देवाण-घेवाणीने जोडलेल्या गोष्टींमध्ये सतर्क राहाल, तितकेच चांगले असेल.
सिंह : तुमच्या मनातील नकारात्मक विचार झटकून टाका. दान कार्यात स्वतःला झोकून द्या व त्यायोगे नकारात्मक विचारावर मात करा.
कन्या : अविचारी वागण्यामुळे बायकोशी तुमचे संबंध बिघडतील. कुठलाही मूर्खपणा करण्यापूर्वी तुमच्या वागणुकीच्या परिणामांबद्दल विचार करा.
तूळ : गुणवत्ता दाखविण्याची चांगली संधी तुम्हाला मिळेल. आज तुम्ही विना कुठल्या कारणास्तव काही लोकांसोबत वादात अडकू शकता.
वृश्चिक : व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल.
धनु : कामाच्या ठिकाणी आज तुमचा सगळ्यांवर प्रभाव राहील. नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. जोडीदार आज तुमची प्रशंसा करेल.
मकर : पैशाशी निगडित काही समस्या येऊ शकते, जी सुरळीत करण्यासाठी तुम्ही पितातुल्य माणसाकडून सल्ला घेऊ शकता.
कुंभ: नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्याही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकता.
मीन : कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे घरचे तुमच्यावर संशय घेतील.