Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर
मेष : जवळच्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. वेळ अनुकूल आहे. काही काळापासून सुरू असलेल्या समस्या दूर होतील. नियोजन सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. घराच्या देखभालीची कामे आखली जातील. मुलांच्या भवितव्याची थोडी चिंता असेल. जमिनी संदर्भातील वाद सोडविताना संयम बाळगा. कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा. व्यावसायिक कार्य योजना यशस्वी होतील. कुटुंबासोबत आनंदात वेळ व्यतित कराल.
वृषभ : आर्थिक नियोजन महत्त्वपूर्ण ठरेल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. चुकीचा सल्ला आणि संगतीमुळे तुमची बदनामी होण्याची शक्यता आहे. अति आळसामुळे महत्त्वाची कामे चुकू शकतात. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय यावेळी घेऊ नका. पती-पत्नीमध्ये सामंजस्य चांगले राहील. घरातील वातावरण आनंदी राहील.
मिथुन : आज सकारात्मक विचार केल्यास महत्त्वाच्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल. जवळच्या मित्रांना अडचणीत मदत कराल. विनाकारण कोणाशीही वाद घालू नका. परिस्थिती संयमाने हाताळा. अन्यथा नसते संकट ओढावून घ्याल. व्यवसायात दैनंदिन काम सहजतेने पूर्ण करा. घर आणि कुटुंबातील वातावरण आनंदी राहिल.
कर्क : आज अनुभवी आणि प्रभावशाली व्यक्तीच्या भेटीमुळे प्रगतीचा नवीन मार्ग सापडले. कामे वेळेवर पूर्ण करण्यास प्राधान्य द्याल. घरात अचानक पाहुणे आल्याने काही महत्त्वाच्या कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. तुम्हाला तुमच्या व्यवहारात लवचिक राहण्याची गरज आहे, वागणूक नम्र ठेवा. वेळीच चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. भागीदारीशी संबंधित व्यवसाय वाढेल. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांसोबत नंदात वेळ जाईल.
सिंह : आज कठीण कामात यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील.वेळ अनुकूल आहे. तुमची कामे नियोजित पद्धतीने करत राहा. जमीन किंवा वाहन खरेदीची योजना असेल. तुमच्या कार्यशैलीचे आणि वागण्याचे कौतुक होईल. मात्र भावनेच्या आहारी जावून निर्णय घेवू नका. उत्पन्नाबरोबरच खर्चही वाढणार आहे. नातेवाईकाची तब्येत बिघडल्याने चिंता वाढेल. व्यवसायात सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. पती-पत्नी एकमेकांच्या समन्वयातून घराची योग्य व्यवस्था राखतील.
कन्या : आज बहुतांश वेळ धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात व्यतित करा. समाजात प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून तुमची ओळख होईल. नवीन पाहुण्यांच्या किलबिलाटाबद्दल चांगली सूचना मिळाल्यावर घरात उत्सवाचे वातावरण असेल. विद्यार्थी व तरुणांनी अभ्यास व करिअरबाबत जागरुक राहावे. व्यवसायात काही व्यत्यय येईल; परंतु चातुर्याने समस्येवर तोडगा काढाल.
तूळ : आज तुमचे संपूर्ण लक्ष कुटुंबाच्या प्रलंबित कामांवर असेल. आर्थिक बाबींमध्ये जोखीम घेणे फायदेशीर ठरेल. एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटल्याने तुमची समस्या दूर होऊ शकते. दुपारनंतर एखाद्याशी वाद होऊ शकतो. अन्यथा त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर गोष्टी करू नका. व्यावसायिक स्पर्धेमध्ये तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतात. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक : तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात व्यस्त राहाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. भावंडांशी वाद वाढू शकतात. समस्या शांततेने सोडवा. वारशाने मिळालेल्या मालमत्तेचे प्रश्नही तुम्हाला त्रास देतील. अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी बेकायदेशीर कामांमध्ये रस घेऊ नका. आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका.
धनु : मागील चूक सुधारत तुम्ही भविष्याबाबत योग्य नियोजन कराल. योग्य गुंतवणूक करू शकाल. तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. जवळच्या नातेवाईकांच्या भेटीही होतील. खोट्या वादात पडू नका. महत्त्वाच्या कामात अपयश आल्याने मन अस्वस्थ होईल. तरुण वर्गाने आपल्या करिअरबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी योग्य चर्चा केली पाहिजे. कोणत्याही व्यावसायिक सहलीशी संबंधित कार्यक्रम होईल जो फायदेशीर ठरेल. कठीण काळात जोडीदार आणि कुटुंबीयांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
मकर : आज तुम्ही दैनंदिन कामांव्यतिरिक्त स्वतःच्या आवडीच्या कामांमध्ये वेळ घालवाल. नाते अधिक गोड करण्याचा प्रयत्न कराल. कोणत्याही प्रकारचा प्रवास कठीण होईल. नेटवर चॅटिंग करताना काळजी घ्या. निष्काळजीपणामुळे बदनामी होऊ शकते. आज तुम्हाला व्यवसायात काही महत्त्वाचे यश मिळवावे लागेल. आरोग्य चांगले राहील.
कुंभ : आज आर्थिक कामे पूर्ण करण्यावर तुमचा भर असेल. पाहुणचार करण्यातही वेळ जाईल. विरोधक नमते घेतील. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यापूर्वी नीट चर्चा करा. कायदेशीर बाबींमध्ये अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पैशाशी संबंधित कोणतेही व्यवहार सध्या करू नका. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे. मित्रांसोबत कौटुंबिक भेट सर्वांना आनंदी ठेवेल. आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका.
मीन : कौटुंबिक आणि वैयक्तिक कामांना प्रथम प्राधान्य द्या. सुखद आणि आनंददायी प्रवासाचा कार्यक्रम होईल. जमिनीशी संबंधित कामात यश मिळेल. इतरांच्या प्रश्नात लक्ष घालू नका अन्यथा तुमची बदनामी होवू शकते. तुमच्या प्रयत्नांमध्ये कोणत्याही प्रकारे तडजोड होणार नाही याची खात्री करा. योग्य फायदा घेण्याची हीच वेळ आहे. व्यवसायातील सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील. कोणत्याही प्रकारची जोखीम घेणे टाळा.