

बाजारावर अमेरिकन आयात शुल्काची छाया आहे असे मागील लेखात सांगितले होते. ट्रम्प यांनी Nationwise टैरिफ वाढीची घोषणा केली आणि अवघ्या जगाला त्यात लपेटून घेतले. त्याला बाजाराने दिलेला नकारात्मक प्रतिसाद अपेक्षित असाच होता. सोमवारी दिनांक ७ एप्रिल रोजी सव्वातीन टक्के निफ्टी गडगडला.
मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सची अवस्था तर खूपच भयानक होती. परंतु, टॅरिफची छाया असली तरी बाजाराची दिशा वरची आहे. हेही मागील लेखात म्हटले होते आणि टॅरिफ वाढीची नव्वद दिवसांची स्थगिती देताच शुक्रवारी बाजारात जी दमदार तेजी आली, तिने ते सिद्धच केले.
वास्तविक, या स्थगितीमुळे नऊ तारखेला अमेरिकन बाजार दहा टक्क्यांहून अधिक वाढले होते आणि दहा तारखेला गिफ्ट निफ्टी ओपनिंगलाच साडेतीन टक्के तेजी दाखवत होता. परंतु, महावीर जयंतीच्या सुट्टीमुळे भारतीय बाजार बंद होते, अन्यथा गुरुवारीच निफ्टीने पुन्हा २३००० चा आकडा पार केला असता.
सर्वत्र शाही महाप्रसाद सुरू आहेत आणि आपण मात्र उपवास असल्यामुळे त्याचा आस्वाद घेऊ शकत नाही, अशी अवस्था गुरुवारी भारतीय गुंतवणूकदारांची विशेषतः ट्रेडर्सची झाली. आता प्रश्न असा आहे की, My Policies never change म्हणणाऱ्या ट्रम्प यांच्यावर रिव्हर्स गिअर टाकण्याची वेळ का आली? अमेरिकन उद्योगपतींची नाराजी, स्वपक्षीय सहकाऱ्यांचा रोष आणि अमेरिकेत सर्वत्र सुरू झालेली ट्रम्प विरोधी निदर्शने यापैकी कशाचीही तमा न बाळगणाऱ्या ट्रम्प यांना अमेरिकन बाँड मार्केटने नमवले.
जगभरातील गुंतवणूकदारांसाठी 'सेफ हेवन' असणाऱ्या आणि अमेरिकन सरकारच्या सर्व योजनांसाठी वित्तीय मूलस्रोत असणाऱ्या बाँड मार्केटमधील उलथापालथ अराजक निर्माण करू शकते, याची जाणीव झाल्यामुळे ट्रम्प यांना हा निर्णय घ्यावा लागला. सप्ताहाच्या अखेरीस निफ्टीने २२७५० चा स्तर राखला ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. येत्या आठवड्यातही हा स्तर राखला गेला तर बाजार मंदगतीने का होईना तेजीच्या दिशेने वर जाऊ लागेल. Q4 चे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे.
टीसीएसचे निकाल Flat असले तरी बाजाराच्या अनुमानाशी सुसंगत आहेत. महत्त्वाच्या कंपन्यांनी चांगले निकाल दिले आणि नव्वद दिवसांची टॅरिफ वाढीची स्थगिती कायमची झाली तर मॉर्गन स्टॅन्लीने केलेले वर्षअखेरीस निफ्टी २८००० चे भाकीत खरे ठरेल. चीनवर १२५ टक्के टॅरिफ आणि भारतावर २६ टक्के, ही तफावत अमेरिकन बाजारपेठेत भारतीय उत्पादनांसाठी सुवर्णसंधी ठरेल हे खरे असले, तरी इतरत्र अगदी भारतही चिनी मालाच्या डंपिंगचा धोका आता सुरू होईल. यादृष्टीने कोणती सेक्टर्स इथून पुढे लक्षवेधक ठरतील? केमिकल्स सेक्टरचे नाव सर्वप्रथम डोळ्यांपुढे येते.
भारतीय केमिकल्स उत्पादक कंपन्यांसाठी अमेरिकन बाजारपेठ अत्यंत महत्त्वाची आहे. PI Industries, Vinati Organics, Clean Science, Navin Fluorine या कंपन्यांचा रेव्हिन्यू अमेरिकेवर अवलंबून आहे. ICICI Securities ने चालू वर्षी केमिकल कंपन्यांचा रेव्हेन्यू १४ टक्के तर Ebitda ३३ टक्के वाढेल. SRF, Navin Fluorine, Gujarat Fluorochemicals, Archean Chemical आणि Bluejet या कंपन्या Out Perform करतील, असा अंदाज वर्तवला आहे.
शुक्रवारी केमिकल कंपन्यांच्या शेअर्समधील तेजी पाहा. PI Industries - CMP Rs. 3618.95- वाढ 9.84% Vinati Organicis - CMP Rs. 1546-वाढ 6.75% SRF-CMP Rs. 2938.70 - वाढ 7.08% Gujarat Fluorochemicals -CMP Rs. 3874 वाढ 5.12% BlueJet-CMP Rs. 688.65-वाढ 10% Sudarshar Chemicals - CMP Rs. 1014.60- वाढ 5.58% वरीलपैकी सुदर्शन केमिकल्स या शेअर्सकडे लक्ष ठेवा. शुक्रवारी या शेअरने साडेपाच टक्के वाढून एक हजारच्या वर क्लोजिंग दिले आहे.
टेक्स्टाईल सेक्टरचा उल्लेख मागील लेखात केला आहे. Electronics Manufacturing Services, (EMS) हे सेक्टरही U.S. China व्यापारयुद्धाचे मोठे लाभार्थी ठरेल. या सेक्टरमधील प्रमुख शेअर्स आणि त्यांच्यातील शुक्रवारची तेजी खालीलप्रमाणे : Dixon Technologies- Rs. 14260-7.36% PG Electroplast Rs. 920-8.06% Amber Enterprises - Rs. 6500-5.53% Kaynes Technology - Rs. 5092.15-5.35% Syrma SGS-Rs. 478.60-10.48% बऱ्याच कंपन्यांचे फंडामेंटल्स स्ट्रॉग असतात.
परंतु, काही कारणांमुळे आणि बाजाराच्या गतीबरोबर ते करेक्ट होतात. मोठ्या पडझडीनंतर ते पुन्हा वर यायला लागतात. अशा दृष्टीने खालील पाच शेअर्सकडे आपले लक्ष असू द्या. येत्या आर्थिक वर्षात हे शेअर्स आपल्याला चांगली कमाई करून देतील असे वाटते. Ircon International - CMP Rs. 149,20 Cello World-CMP Rs. 521.05 Amara Raja Energy & Mobility-CMP Rs. 975.00 Godrej Properties CMP Rs. 1945.70 Blue Dart Express - CMP Rs. 6335.00 तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे मिळवायचे असतील तर कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी, याबरोबरच कुठे गुंतवणूक करू नये, याचाही निर्णय घेता आला पाहिजे.
हा निर्णय घेण्यासाठी गुंतवणूक विश्वातील प्रत्येक बातमी लक्षपूर्वक वाचली पाहिजे. उदाहरणार्थ ही बातमी पाहा: भारतातील सर्वात मोठा फ्लेक्झी कॅप फंड पराग पारीख फ्लेक्सी कॅप फंडाने मार्च महिन्यात कोल इंडिया, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि पॉवर ग्रीड या कंपन्यांचे शेअर्स विकले. ते का विकले असतील याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. अशा प्रयत्नांमधूनच आपण Market Expert बनू शकतो.