

Stock Market Updates
इस्रायल- इराण यांच्यातील युद्धबंदीमुळे मध्य- पूर्वेतील तणाव कमी झाल्याने भारतीय शेअर बाजार गुरुवारी (दि.२६ जून) सलग तिसऱ्या दिवशी तेजीत खुला झाला. सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी वाढून ८३,३०० वर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक १७४ अंकांच्या वाढीसह २५,४०० वर व्यवहार करत आहे.
क्षेत्रीय निर्देशांकात संमिश्र ट्रेंड दिसून आला. निफ्टी ऑटो, फायनान्शियल सर्व्हिसेस, एफएमसीजी, मेटल, फार्मा, कंझ्यूमर ड्युरेबल आणि ऑइल अँड गॅस निर्देशांक तेजीत खुले झाले आहेत.
सेन्सेक्सवर बजाज फायनान्स, भारती एअरटेल हे शेअर्स २ टक्के वाढले आहेत. त्याचबरोबर रिलायन्स, इर्टनल, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स १ ते १.५ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. तर दुसरीकडे ट्रेंट, टेक महिंद्रा, एसबीआय, टीसीएस, एम अँड एम हे शेअर्स घसरले आहेत.
इस्रायल- इराण यांच्यातील संघर्ष कमी झाल्याने कच्च्या तेलाचे दर खाली आले आहेत. यामुळे बाजारातील भावना उंचावल्या आहेत. यामुळे सेन्सेक्स- निफ्टी वाढले आहेत. बुधवारी सेन्सेक्स ७०० अंकांनी वाढून ८२,७५५ वर स्थिरावला होता. निफ्टी ५० निर्देशांक २०० अंकांनी वाढून २५,२४४ वर बंद झाला होता. आज सलग तिसऱ्या दिवशी बाजाराने हिरव्या रंगात सुरुवात केली आहे.