पुढारी ऑनलाईन डेस्क
फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांनी सप्टेंबरमध्ये व्याजदर कपात होणार असल्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने (Stock Market Updates) गुरुवारी तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) २०० हून अधिक वाढून ८१,१०० वर पोहोचला. तर निफ्टी (Nifty) ६१ अंकांच्या वाढीसह २४,८०० च्या वर होता.
सेन्सेक्सवर भारती एअरटेल, इन्फोसिस, एसबीआय, एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक हे शेअर्स हिरव्या रंगात खुले झाले आहेत. तर पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, एम अँड एम, एनटीपीसी या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.
निफ्टी ५० वर ग्रासीम, टाटा कन्झ्यूमर, भारती एअरटेल, इन्फोसिस हे शेअर्स तेजीत आहेत. तर पॉवर ग्रिड, डॉ. रेड्डीज, श्रीराम फायनान्स या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.