सेन्सेक्स-निफ्टी विक्रमी उच्चांकावर, 'या' शेअर्सची धूम

सेन्सेक्सनेही पहिल्यांदा पार केला 84,800चा टप्पा
Stock Market, Sensex, Nifty
सेन्सेक्ससह निफ्टीने आज नवे शिखर गाठले. (File Photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक बाजारातून मिळणार्‍या सकारात्‍मक संकेतामुळे आठवड्याच्‍या पहिल्‍या दिवशी आज (23 सप्टेंबर) शेअर बाजारातील व्‍यवहारांना दमदार सुरुवात झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स-निफ्टीने नवा उच्चांक गाठला. निफ्टीने पहिल्यांदाच 25,900 चा तर सेन्सेक्सनेही पहिल्यांदाच 84,800 चा टप्पा पार केला. निफ्टी बँकेत किंचित वाढ झाली.

'या' शेअर्संनी मारली बाजी

आज बाजारात व्‍यवहार सुरु होताच मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही मजबूती दिसून आली. बाजाराची सुरुवात तेजीने झाली. सेन्सेक्स 221.71 अंकांच्या किंवा 0.26 टक्क्यांच्या वाढीसह 84,766.02 च्या पातळीवर तर निफ्टी 80.70 अंकांच्या किंवा 0.31 टक्क्यांच्या वाढीसह 25,871.65 च्या पातळीवर व्यवहार करत होता.टाटा स्टील, एचडीएफसी लाइफ, ग्रासिम हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. त्याच वेळी, व्होडाफोन आयडियाने सुमारे 6% ची वाढ नोंदवली.

व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये 11% वाढ

नोकिया, एरिक्सन आणि सॅमसंगसोबत 30,000 कोटी रुपयांच्या करारामुळे व्होडाफोन आयडियाचे शेअर्स तब्‍बल ११ टक्‍क्‍यांनी वधारले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news