विक्रमी उच्चांकानंतर प्रॉफिट बुकिंग! सेन्सेक्स २६४ अंकांनी घसरून बंद

Stock Market Closing Bell | बँकिंग, FMCG शेअर्समध्ये घसरण
Stock Market, BSE benchmark Sensex, NSE Nifty
सेन्सेक्स, निफ्टी आज घसरणीसह बंद झाले.file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारतीय शेअर बाजारात आज शुक्रवारी (दि.२७) चढ-उताराचा खेळ दिसून आला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ८५,९७८ च्या नव्या उच्चाकांला स्पर्श केला. त्यानंतर तो उच्चांकावरुन माघारी परतत २६४ अंकांच्या घसरणीसह ८५,५७१ वर बंद झाला. तर निफ्टी ३७ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २६,१७८ वर स्थिरावला. बाजारात आज प्रॉफिट बुकिंगचा परिणाम दिसून आला.

क्षेत्रीय पातळीवर संमिश्र वातावरण

क्षेत्रीय निर्देशांकांत आज संमिश्र वातावरण दिसून आले. ऑटो, मेटल, आयटी, फार्मा, ऑईल आणि गॅस प्रत्येकी ०.३ ते २.५ टक्क्यांनी वाढले. तर रियल्टी, पॉवर, बँक, मीडिया, एफएमसीजी, टेलिकॉम निर्देशांकात घसरण झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप सपाट पातळीवर बंद झाला.

बाजारात आज नेमकं काय झालं?

गेल्या काही दिवसांपासून बाजारात विक्रमी तेजी कायम राहिली होती. पण आजच्या अस्थिर सत्रात या तेजीला ब्रेक लागला. मीडिया, बँक आणि रियल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्री दिसून आली. बाजाराने आज सपाट सुरुवात केली होती. त्यानंतर सुरुवातीच्या काही तासांतच बाजाराने नवा विक्रमी उच्चांक नोंदवला. पण दुसऱ्या सत्रात विक्रीच्या दबावामुळे दोन्ही निर्देशांक घसरले.

Sensex Today : कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

सेन्सेक्सवर पॉवर ग्रिड, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एलटी, कोटक बँक, अदानी पोर्ट्स हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले. तर सन फार्मा, बजाज फिनसर्व्ह, टायटन, एनटीपीसी, एचसीएल टेक, रिलायन्स, एशियन पेट्स हे शेअर्स तेजीत राहिले.

BSE Sensex
सेन्सेक्सवर पॉवर ग्रिड टॉप लूजर ठरला.(BSE)

Nifty 50 ची काय परिस्थिती?

निफ्टीवर पॉवर ग्रिड, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, हिरो मोटोकॉर्प हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले. तर बीपीसीएलचा शेअर्स ६ टक्के वाढून टॉप गेनर ठरला. त्याचबरोबर सिप्ला, सन फार्मा, डिव्हिस लॅब, रिलायन्स हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांनी वाढले.

NSE Nifty
निफ्टीने आज सपाट पातळीवर व्यवहार केला. (NSE)
Stock Market, BSE benchmark Sensex, NSE Nifty
म्युच्युअल फंड आणि नवी कररचना

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news