सेन्सेक्स ६११ अंकांनी वाढून बंद, 'निफ्टी'चीही दमदार कामगिरी, गुंतवणूकदार मालामाल

Stock Market Closing Bell | जाणून घ्या बाजारातील तेजीची ४ कारणे
Stock Market BSE Sensex
सेन्सेक्स आज हिरव्या रंगात बंद झाला.file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदरात कपातीचे संकेत दिल्यानंतर आज सोमवारी भारतीय शेअर बाजारात (Stock Market) फायनान्सियल आणि आयटी शेअर्समध्ये जोरदार तेजी राहिली. यामुळे सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) ५० ने आज उच्चांकावर व्यवहार केला. सेन्सेक्स ६११ अंकांनी वाढून ८१,६९८ वर बंद झाला. तर निफ्टीने १८७ अंकांच्या वाढीसह २५,०१० चा टप्पा पुन्हा एकदा गाठला.

आज सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीत बंद झाले. आयटी, मेटल, ऑईल आणि गॅस, रियल्टी १ ते १ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप ०.६ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप ०.२ टक्क्यांनी वाढून बंद झाला.

Summary

ठळक मुद्दे

  • सेन्सेक्स ६११ अंकांनी वाढून ८१,६९८ वर बंद.

  • निफ्टीने १८७ अंकांच्या वाढीसह गाठला २५,०१० चा टप्पा.

  • आयटी, मेटल, ऑईल आणि गॅस, रियल्टी १ ते १ टक्क्यांनी वाढले.

  • बीएसई मिडकॅपमध्ये ०.६ टक्के वाढ.

  • आयटी आणि फायनान्सियल शेअर्स सर्वाधिक तेजीत.

गुंतवणूकदारांनी कमावले २.४३ लाख कोटी

बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज २६ ऑगस्ट रोजी २.४३ लाख कोटींनी वाढून ४६२.३९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी बाजार भांडवल ४५९.९६ लाख कोटी रुपयांवर होते.

Sensex Today : सेन्सेक्सवर कोणते शेअर्स वाढले?

सेन्सेक्सवर एनटीपीसी, एचसीएल टेक, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, टायटन, एलटी, एम अँड एम हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर अदानी पोर्ट्स, नेस्ले इंडिया, मारुती या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

BSE Sensex
सेन्सेक्स आज ६११ अंकांनी वाढून ८१,६९८ वर बंद झाला.BSE

Nifty Today : निफ्टीवर काय स्थिती?

एनएसई निफ्टीवर हिंदाल्को, एचसीएल टेक, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, ओएनजीसी हे शेअर्स २ ते ४ टक्क्यांनी वाढले. तर अपोलो हॉस्पिटल, हिरो मोटोकॉर्प, अदानी पोर्ट्स, मारुती हे शेअर्स घसरले.

NSE Nifty
निफ्टी ५० चा आजचा ट्रेडिंग आलेख.NSE

...तर भारतीय बाजारात गुंतवणुकीचा ओघ वाढू शकतो

महागाई वाढण्याची जोखीम कमी झाली आहे. यामुळे यावेळी व्याजदर कमी करण्याची वेळ आली असल्याचे फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष पॉवेल यांनी म्हटले आहे. अमेरिकेतील व्याजदर कपातीमुळे भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढू शकतो. यामुळे देशांतर्गत इक्विटीमध्ये सतत वाढ होऊ शकते, असे बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे.

जागतिक बाजार; गुंतवणूकदार सावध

आशियाई बाजारातील गुंतवणूकदारांची आज सावध भूमिका दिसून आली. एमएससीआयचा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सच्या विस्तृत निर्देशांकात ०.८ टक्के वाढ झाली. गेल्या आठवड्यात हा निर्देशांक १.१ टक्के वाढला होता. दक्षिण कोरियाचा कोस्पीमध्ये मोठा बदल दिसून आला नाही. जपानचा निक्केई निर्देशांकात घसरण दिसून आली.

परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदीवर जोर कायम

परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारात खरेदीवर जोर कायम आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) २३ ऑगस्ट रोजी १,९४४ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनीही याच दिवशी २,८९६ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

मध्य पूर्वेत संघर्ष वाढल्यामुळे तेल पुरवठा विस्कळीत होऊ शकतो या भीतीने तेलाच्या किमती सोमवारी वाढल्या. ब्रेंट क्रूड फ्युचर्स ०.६३ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७८.६४ डॉलरवर पोहोचले. तर यूएस क्रूड फ्युचर्स ०.७३ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७५.३८ डॉलरवर होते.

Stock Market BSE Sensex
Stock Market : बडी तेजी की ओर... आहिस्ता, आहिस्ता!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news