पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारातील 'बुल रन' आजही सुरूच राहिली. निफ्टी आज वधारत २५९३९.०५ अंकांवर बंद झाला, तर सन्सेक्स इतक्या ८४९२८.६१ अंकांवर थांबला. त्यामुळे निफ्टी येत्या काही दिवसांत २६०००चा उच्चांक ओलांडणार का याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे.
सोमवारी आठवड्याची सकारात्मक झाली. Nifty 50 हा निर्देशांक ०.२५ टक्के वधारत २५८५६.०५ अंकांनी खुला झाला तर सन्सेक्स १५० पॉईंटने वाढत ८४६९३ अंकांनी खुला झाला. सेक्टरनिहाय असलेले सर्वंच इंडेक्स आज ग्रीनमध्ये राहिले, बँक निफ्टी ११ पॉईंटने वाढत ५३.७८३ अंकांनी खुला झाला. याला फक्त आयटी सेक्टर अपवाद राहिला.
"ऊर्जा, बँकिंग आणि वाहन उद्योग या क्षेत्रांतील कंपन्यांनी आज चांगली कामगिरी नोंदवली तर आयटी क्षेत्रातील कंपन्यांना आज छाप पाडता आलेली नाही. Nifty ने आता २६००० अंकांचा उद्देश ठेवल्याचे दिसते, यात बँकाचा वाटा मोठा असणार आहे," असे स्टॉक्सकार्ट या संस्थेने म्हटलेले आहे.
आज दिवसभरात सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँक, इंडियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांच्या शेअर्सनी चमकादर कामगिरी केली.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बरोबरीने आज ONGC, BPCL, बजाज ऑटो या कंपन्या टॉप गेनर्समध्ये राहिल्या.