stock market : निफ्टी पुनश्च 22000 च्या पार

stock market
stock market
Published on
Updated on

निफ्टी 22000 च्या वर, निफ्टी बँक 46000 च्या वर आणि सेन्सेक्स 72000 च्या वर हे सुखद चित्र शुक्रवारी म्हणजे सप्ताहाच्या अखेरीस पाहायला मिळाले. आता निफ्टीने जर आपला पूर्वीचा all time high 22126.80 नवीन सप्ताहाच्या सुरुवातीसच पार केला, तर निफ्टीचे 22500 च्या दिशेने मार्गक्रमण सुरू होईल. ( stock market )

संबंधित बातम्या 

मागील सप्ताहात निफ्टी जो दीड टक्क्याने वाढला, त्याला प्रामुख्याने कारणीभूत होते निफ्टी ऑटो आणि निफ्टी पीएसयू बँक हे दोन निर्देशांक. निफ्टी ऑटो चार टक्क्यांनी वाढून आपल्या पूर्वीच्या 20515.05 या उच्चांकाच्या जवळ आहे आणि याच सप्ताहात तो नवीन उच्चांक प्रस्थापित करण्याची शक्यता आहे.

वोक्सवॅगन या जर्मन ग्रुपबरोबरचा सामंजस्य करार, तिसर्‍या तिमाहीचे उत्कृष्ट निकाल आणि SUV, LCV, Tractor, three wheeler, Electric या सर्व संगमेंटसमध्ये मार्केटमधील आघाडी या गोष्टी महिंद्र अँड महिंद्रच्या तेजीस कारणीभूत ठरल्या. अल्पावधीतच हा शेअर रु. 2000 चा आकडा पार करेल.

मारुती सुझुकीच्या पाठोपाठ बजाज ऑटोही 10000 चा आकडा पार करण्यास उत्सुक आहे. 28 फेब्रुवारी 2023 रोजी त्या शेअरची किंमत रु. 3625.60 होती. म्हणजे एक वर्षाच्या आत त्या शेअरने 130 टक्के परतावा दिला आहे. मल्टीबॅगर स्मॉल कँपस शोधण्याच्या नादात आपण या दिग्गज शेअर्सकडे नेहमी दुर्लक्ष करतो.

निफ्टी पीएसयू बँक हा निर्देशांकही गत सप्ताहात पावणेचार टक्क्यांनी वाढला. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक या शेअर्सनी नवीन उच्चांक प्रस्थापित केले. एसबीआय (सध्याचा भाव रु. 754.70) आठवड्यात जवळपास 8 टक्के वाढला आणि एक महिन्यात 18 टक्के वाढला. या प्रतिष्ठित आणि दर्जेदार शेअर्सची रु. 1000 कडे वाटचाल सुरू आहे. फेडरल बँकेचा शेअरही सप्ताहात साडेबारा टक्के वाढला. (रु. 164.70), रु. 165.80 हा नवीन उच्चांकही त्याने प्रस्थापित केला.

एका महिन्यात 15 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवणार्‍या एचडीएफसी बँकेचा शेअर आठवड्यात सव्वा टक्क्याने वाढला. 14 फेब्रुवारी रोजीचा त्याचा रु. 1363.55 हा भाव नीचांक ठरो, अशी ईश्वराजवळ प्रार्थना. कारण हा शेअर केवळ निफ्टी आणि बँक निफ्टीचाच मोठा भागधारक नाही, तर भारतातील बहुतेक सर्व म्युच्युअल फंडांचे Highest Allocation या शेअरमध्ये आहे. निफ्टी मेटल हा निर्देशांक गत सप्ताहाच्या Bad Performer ठरला. तीन टक्क्यांनी तो घसरला. हिंदाल्को, रत्नमणी, हिंद कॉपर हे शेअर्स 10 टक्क्यांहून अधिक घसरले.

MRPL ( Mangalore Refinery and petrochindes LTD) चा शेअर सप्ताहात वीस टक्के वाढला. (रु. 241.05) केवळ तीन महिन्यांत तो 100 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. NRPL ही ONGC ची उपकंपनी आहे.

पेटीएमची घसरण अव्याहत सुरू आहे. टीव्हीएस मोटर्सने रु. 1 लाख कोटी बाजार भांडवलाचा टप्पा पार केला. FII नी गत सप्ताहात रु. 6237.80 कोटींची निव्वळ विक्री केली. याउलट सलग पाचही दिवस DII नी भरघोस खरेदी केली. रु. 8731.60 कोटींची निव्वळ खरेदी DII नी केली आणि अंतिमतः बाजार तेजीत राहिला. काही वर्षांपूर्वीचे भारतीय बाजार पूर्णतः FII च्या खरेदी विक्रीवर अवलंबून असतात. हे चित्र पूर्णपणे बदलल्याचे हे द्योतक आहे.

आता शेवटी एका अत्यंत महत्त्वाच्या आणि स्फोटक बातमीबाबत, सेबीच्या वेबसाईटवर 8 फेब्रुवारी रोजी In the matter of trading based on stock recommendations given by guest experts on zee business channel या शीर्षकाखाली 127 पानांची interim order cum show cause notice प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही नोटीस एकूण 15 जणांविरुद्ध (व्यक्ती + फर्मस) आहे.

नोटिसीचा सारांश असा ; झी बिझनेस चॅनेलवर guest experts म्हणून stock recommendation देणार्‍या पाच experts
नी ठरवून बेकायदेशीरपणे stocks recommend केले आणि अवैध मार्गाने पैसे गोळा केले. जागेअभावी या माहितीचा तपशील इथे देता येत नाही. परंतु, देशातील कोट्यवधी गुंतवणूकदारांच्या ट्रेडर्सच्या पैशाशी दगाबाजी करणार्‍या या घटनेचा वृत्तांतही कोठे नाही. सर्वत्र चिडिचूप आहे. इथून पुढे बिझनेस चॅनेलवर भरवसा असणार्‍या गुंतवणूकदारांच्या माहितीसाठी झी बिझनेसवरचे हे फ्रॉड एक्सपर्टस् खालीलप्रमाणे. 1) किरण जाधव, 2) आशिष केळकर, 3) हिमांशू गुप्ता, 4) मुदित गोयल, 5) सिमी भौमिक. ( stock market )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news