Closing Bell : ‘खरेदी’च्‍या मूडने सेन्सेक्समध्‍ये ‘तेजी’, गुंतवणुकदारांनी कमावले 4.36 लाख कोटी 

Closing Bell : ‘खरेदी’च्‍या मूडने सेन्सेक्समध्‍ये ‘तेजी’, गुंतवणुकदारांनी कमावले 4.36 लाख कोटी 
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : शेअर बाजारात आज (दि.६फेब्रुवारी) गुंतवणुकदारांनी जोरदार खरेदी केली. बाजारातील प्रमुख निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. सेन्सेक्स 454 अंकांनी वाढून 72,186 वर पोहोचला. निफ्टीही 157 अंकांनी वाढून 21,929 वर बंद झाला. आयटी, ऑटो, धातू आणि फार्मा सेक्टरमध्येही खरेदी दिसून आली. तर बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्रात विक्री अनुभवली. दरम्‍यान, सोमवार, ५ फेब्रुवारी राेजी सेन्सेक्स 354 अंकांनी घसरून 71,731 वर बंद झाला होता.

शेअर बाजारात आज व्‍यवहाराची सुरुवात सकारात्‍मक झाली. बेंचमार्क इक्विटी निर्देशांकांनी मंगळवारचे ट्रेडिंग सत्र सकारात्मक क्षेत्रात उघडले. निफ्टी 50 53.50 अंकांनी 21,825.20 वर स्थिरावला, तर सेन्सेक्स 240.76 अंकांनी वधारत 71,970.82 वर उघडला.

आयटी, ऑटो आणि फार्मा क्षेत्रात सर्वाधिक खरेदी

आजच्‍या प्रारंभीच्‍या व्‍यवहारात भारती एअरटेलचा शेअर निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढला. तर सर्वाधिक खरेदी ऑटो, आयटी आणि फार्मा क्षेत्रात होती. आज आयटी शेअर्समध्‍ये तुफानी वाढ झाली. निफ्टी आयटी इंडेक्सने 2% पेक्षा जास्त उसळी घेऊन 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. TCS जवळपास 4% च्या उसळीसह निफ्टीचा टॉप गेनर बनला आहे.

गुंतवणुकदारांनी कमावले 4.36 लाख कोटी

एक ट्रेडिंग दिवस आधी म्हणजे 5 फेब्रुवारी 2024 रोजी, BSE वर सूचीबद्ध सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 382.61 लाख कोटी रुपये होते. आज म्हणजेच 6 फेब्रुवारीला तो 386.97 लाख कोटी रुपयांवर पोहोचला. गुंतवणूकदारांच्या भांडवलात सुमारे 4.36 कोटी रुपयांची वाढ झाली.

टॉप गेनर्स, टॉप लुजर्स

एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स, बीपीसीएल, भारती एअरटेल, विप्रो आणि टीसीएस निफ्टी 50 मध्ये सर्वाधिक वाढले. एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सचे शेअर्स जवळपास 4% वाढून 585.60 रुपयांवर पोहोचले. Nity 50 मध्ये शेअर सर्वाधिक वाढला. तर हिंडाल्‍को इंडस्ट्रीज, अपोलो हॉस्पिटल्स, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज हे NSE निफ्टी 50 निर्देशांकात सर्वाधिक नुकसान करणारे ठरले.

'टीसीएस'चे बाजार भांडवल १५ लाख कोटी पार

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे बाजार भांडवल प्रथमच 15 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. आयटी कंपनीच्या शेअर्सने आज (दि.६) ट्रेडिंगदरम्यान विक्रमी उच्चांक गाठला होता. ५२ आठवड्यानंतरची ही सर्वाधिक उच्‍चांकी काम.िगिरी ठरली.  दुपारी 2:32 वाजता कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर व्यवहार करत होते. यापूर्वी ट्रेडिंग दरम्यान, कंपनीच्या शेअर्सने इंट्राडे विक्रमी 4,135 रुपयांची पातळी गाठली होती. निफ्टीच्या आयटी निर्देशांकात सर्वात मोठी वाढ दिसून येत आहे, तर निफ्टी 50 0.65 टक्क्यांनी वधारत होता. विप्रो, एचसीएल टेक आणि एमफेसिसनंतर टीसीएसमध्ये सर्वात मोठी वाढ दिसून आली.

येस बँकेच्या शेअर्समध्ये १३ टक्‍के वाढ

येस बँकेच्या शेअर्समध्ये आज जोरदार खरेदीचा कल आहे. बीएसईच्या इंट्रा-डेमध्ये त्याच्या शेअर्समध्ये सुमारे 13 टक्क्यांनी वाढ झाली. शेअर्स खरेदी करण्याचा हा कल एचडीएफसी बँकेमुळे आहे. आरबीआयने येस बँकेतील हिस्सा वाढवण्यास मान्यता दिली आहे. सध्या बीएसईवर 10.79 टक्क्यांच्या वाढीसह त्याची किंमत 25.26 रुपये आहे. इंट्रा-डेमध्ये तो 12.63 टक्क्यांनी वाढून 25.68 रुपयांवर पोहोचला (येस बँक शेअरची किंमत).

सेन्सेक्सचे १९ शेअर आज हिरव्‍या रंगात बंद

सेन्सेक्सवर 30 शेअर्स सूचीबद्ध आहेत, त्यापैकी आज फक्त 19 ग्रीन झोनमध्ये बंद झाले. आज सर्वाधिक वाढ एचसीएल, टीसीएस आणि मारुतीमध्ये झाली. दुसरीकडे, पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक आणि आयटीसीमध्ये आज सर्वात मोठी घसरण झाली.

बाजारातील आजच्‍या ठळक घडामोडी

  • आयटी शेअर्समध्‍ये जाेरदार खरेदी
  • मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांकाची दमदार वाटचाल
  • साखर, रिअल इस्टेट, तेल आणि वायू क्षेत्राला पसंती
  • तीन दिवसांच्या घसरणीनंतर पेटीएम वाढले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news