बिझनेस सायकल फंड : स्वरूप कसे असते? | पुढारी

बिझनेस सायकल फंड : स्वरूप कसे असते?

भरत साळोखे

बिझनेस सायकल फंड हे एक प्रकारे थिमॅटीक फंड असतात. परंतु सर्वसाधारण थिमॅटीक फंडापेक्षा ते अधिक अ‍ॅक्टिव्ह असतात. अर्थव्यवस्थेचे स्वरूप जसे बदलेल तसे ते आपले गुंतवणुकीचे क्षेत्र बदलतात. शिवाय ते थिमॅटीक फंड एक किंवा दोन क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करतात. परंतु बिझनेस सायकल फंडस्ना सेक्टर्सची मर्यादा नसते.

शेअर बाजाराची दिशा ही नेहमीच वरची असते. एप्रिल 1986 (Base year 1 April 1979) रु.100 ने सुरू झालेला सेन्सेक्स आज 60,000 च्या आसपास आहे; तर एप्रिल 1996 मध्ये रु. 1000 ने सुरू झालेला निफ्टी 50 हा इंडेक्स आज 18,000 च्या जवळपास आहे. सरासरी 17 टक्के रिटर्नस् या दोन्ही निर्देशांकांनी स्थापनेपासून दिलेले आहेत. जे मुदत ठेवी सोने, रिअल इस्टेट या पारंपरिक गुंतवणूक साधनांपेक्षा कितीतरी अधिक आहेत.

मग असे जर आहे, तर लोक शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यास का घाबरतात? कारण शेअर बाजाराची दिशा नेहमीच वरची असली तरी तिचा मार्ग सरळ नसतो. तेजी-मंदीच्या हेलकाव्यांनी अल्प ते मध्यम काळामध्ये शेअर बाजार नेहमीच अनिश्चिततेने ग्रासलेला असतो. देशोदेशीच्या अर्थव्यवस्था विभिन्न अवस्थांमधून जात असतात. कधी त्या तेजीच्या वारूवर स्वार होतात, तर कधी मंदीच्या झाकोळाने काळवंडून जातात.

देशाची अर्थव्यवस्था ज्या टप्प्यांमधून प्रवास करते, त्यांचा परिणाम देशातील व्यवसाय क्षेत्रावर होत असतो. Expansion(विस्तार), Peak(उच्चतम विस्तार), Contraction(आंकुचन) आणि Slump(मंदी) या चार अवस्थांमधून व्यवसाय क्षेत्र मार्गक्रमण करत असते. ज्यांना macro-economic factor म्हणतात. (उदा. Fiscal Policy, Monetary Policy, Global Events, Economic Reforms, Geographic and Political conditions, inflation, unemployment, taxes इ.) त्यांचा परिणाम व्यवसायांवर फार मोठ्या प्रमाणावर पडत असतो. याशिवाय एखाद्या कंपनीचा व्यवसाय विस्तार, तिच्या उत्पादनांना असणारी मागणी, स्पर्धा वगैरे घटक असतातच. म्हणून देशाची अर्थव्यवस्था आणि त्या अनुषंगाने त्या देशातील व्यवसाय, व्यापार क्षेत्र हे वर उल्लेख केलेल्या Expansion, Peak, Contraction आणि Slump या चार Cycles मधून जात असतात. शेअर बाजारातील आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही खाली-वर होत राहते, ती या Business Cycles मुळे!

मग या Business Cycles ना ओळखून आणि कोणत्या Cycle मध्ये कोणती क्षेत्रे चांगली कामगिरी करतात आणि कोणती क्षेत्रे खराब कामगिरी करतात, याचा विचार करून त्याप्रमाणे गुंतवणूक धोरण आखले तर?

नेमके हेच Business Cycle फंडस् करतात. त्यांच्या गुंतवणुकीचा द़ृष्टिकोन हा Top – Down असतो. म्हणजे ते प्रथम देशाची अर्थव्यवस्था कोणत्या टप्प्यात आहे ते पाहतात. त्या टप्प्यानुसार कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीची संधी आहे, हे शोधतात. आणि मग त्या क्षेत्रामधील विविध कंपन्यांचा सखोल अभ्यास करून उत्तम कंपन्यांची निवड करतात. आणि त्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात.

Business Cycle फंड हे एक प्रकारे Thematic फंड असतात. परंतु सर्वसाधारण Thematic फंडापेक्षा ते अधिक Active असतात. अर्थव्यवस्थेचे स्वरूप जसे बदलेल तसे ते आपले गुंतवणुकीचे Sector बदलतात. शिवाय ते Thematic फंड हे एक किंवा दोन, Sector मध्ये गुंतवणूक करतात. परंतु Business Cycle फंडस्ना सेक्टर्सची मर्यादा नसते. शिवाय ते Large Cap, Mid cap, Small Cap अशा सर्व कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. त्या अर्थाने ते flexi cap फंडाच्या अधिक जवळचे आहेत.

Business Cycle फंडाचे यश हे संपूर्णपणे फंड मॅनेरच्या कौशल्यावर आणि अभ्यासावर अवलंबून असते. यापूर्वीही Tata Business Cycle फंड आणि ICICI Prudential Business Cycle फंड हे बाजारात आलेले आहेत. आयसीआयसीआय फंड 18 जानेवारी, 2021 रोजी तर टाटा फंड 4 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाला. त्यांनी आजअखेर अनुक्रमे 30.20% आणि 6.92% रिटन्स दिले आहेत.

आदित्य बिर्ला सन लाईफनेही आपला Business Cycle फंड बाजारात आणला आहे. 15 नोव्हेंबर, 2021 रोजी तो सुरू झाला आहे आणि 29 नोव्हेंबर, 2021 पर्यंत तो 10 रुपये दर्शनी मूल्याने गुंतवणुकीस खुला राहील. किमान गुंतवणूक रु. 500 करता येईल. विनीत माल आणि नितेश जैन हे दोघे फंड मॅनेजर संयुक्तपणे या फंडाचे व्यवस्थापन पाहतील.

या फंडाचे स्वरूप हे बरेचसे Fexi Cap फंडासारखे असल्याने ते सर्वसाधारण गुंतवणूकदारांसाठी गुतवणूक योग्य आहेत.

Business Cycle ओळखून आपले गुंतवणूक धोरण आखणे हे कधीही श्रेयस्करच तेजीच्या काळात Infra.meta, Consumer Durable ही सेक्टर्स किती चांगली कामगिरी करतात. आणि मंदीच्या काळत FMCG. Pharma, IT ही क्षेत्रे मंदीची लाट कधी थोपवून धरतात. हे आपण पाहतोच. शिवाय काही अनन्य साधारण प्रसंग म्हणा किंवा आपली म्हणा, देशावर किंवा जगावर येत राहतात. अशा वेळी कुशल फंड मॅनेजर आपले गुंतवणूक धोरण बदलतो किंवा पूर्णपणे नव्याने आखतो.

कोरोनाच्या महामारीने फार्मा सेक्टर किती बहरले आणि Work From Home मुळे आयटी सेक्टरमधील कंपन्यांचा व्यवस्थापन खर्च कमी होऊन त्यांचा नफा किती वाढला हे आपण पाहिलेच आहे. त्यामुळे एखादा नावलौकिक असलेला फंड मॅनेजर असेल, तर त्या Business Cycle फंडामध्ये आपल्या आर्थिक आणि जोखीम क्षमतेनुसार अवश्य गुंतणूक करावी.
(लेखक अक्षय प्रॉफिट अ‍ॅण्ड वेल्थ प्रा.लि.चे संचालक आहेत.)

Back to top button