
पुढारी ऑनलाईन : सूरज इस्टेट डेव्हलपर्सचा आयपीओ (IPO-इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आज सोमवारी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला. हा इश्यू ओपनिंगच्या आधी कंपनीला अँकर गुंतवणूकदारांकडून १२० कोटी रुपये मिळाले आहेत. या IPO मध्ये ४०० कोटी रुपयांपर्यंतच्या नवीन इश्यूचा समावेश आहे. या सार्वजनिक ऑफरमध्ये ऑफर फॉर सेल सेगमेंट नाही. (Suraj Estate Developers IPO)
संबंधित बातम्या
मुंबई येथील या रिअल इस्टेट कंपनीने त्याच्या IPO साठी ३४०-३६० रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. गुंतवणूकदार त्यासाठी किमान ४१ शेअर्ससाठी एका लॉटमध्ये आणि त्यानंतर पटीत बोली लावू शकतात.
सूरज इस्टेट मुंबईतील रिअल इस्टेट मार्केटमध्ये ३६ वर्षांपासूनचे कार्यरत आहे. ही कंपनी संपूर्ण दक्षिण मध्य मुंबईत निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता विकसित करत आहे.
जयपूर स्थित ज्वेलरी कंपनी Motisons Jewellers ने आज सोमवारी सबस्क्रिप्शनसाठी त्यांचा आयपीओ खुला केला. त्याची प्राइस बँड ५२-५५ प्रति शेअर निश्चित केली आहे. हे सबस्क्रिप्शन २० डिसेंबरपर्यंत खुले राहणार आहे. (Motisons Jewellers IPO) सकाळच्या सत्रात या आयपीओने २.३४ पट सबस्क्रिप्शन मिळवले होते. रिटेल श्रेणीत ३.६० पट, तर NII भागाने १.९२ पट बोली मिळविली. आतापर्यंत पात्र संस्थात्मक खरेदीदारांकडून कोणतीही बोली आलेली नाही.
दरम्यान, सियाराम रिसायकलिंग आयपीओला (Siyaram Recycling IPO) गुंतवणूकदारांकडून पहिल्या दोन दिवसांत चांगला प्रतिसाद मिळाला. या आयपीओने २ ट्रेडिंग दिवसांत ८० टक्क्यांहून अधिक सबस्क्रिप्शन मिळवले. या आयपीओची प्राइस बँड ४३ रुपये ते ४६ रुपये प्रति शेअर आहे.
ग्रे मार्केटमध्ये वर्चस्व निर्माण करण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे. सोमवारी सकाळी सियाराम रिसायकलिंगचा IPO ३६ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत होता. सियाराम रिसायकलिंग IPO ला पहिल्या दिवशी १४ डिसेंबरला २० पटी पेक्षा जास्त वेळा सबस्क्रिप्शन मिळाले. तर दुसऱ्या दिवशी १५ डिसेंबर रोजी ५९.९५ पट सबस्क्रिप्शन प्राप्त झाले. या दिवशी रिटेल श्रेणीत १०६.५७ पट सबस्क्रिप्शन मिळाले. या IPO वर पैसे लावण्याची गुंतवणूकदारांना आज शेवटची संधी आहे.