वाहन विम्याचा हप्ता कसा कमी करावा? | पुढारी

वाहन विम्याचा हप्ता कसा कमी करावा?

जगदीश काळे

मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक वाहन मालकांनी आपल्या वाहनासाठी मोटार इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करणे बंधनकारक आहे.

वाहन खरेदी ही प्रत्येकाच्या आयुष्यातील मोठी घटना आहे. प्रत्येक व्यक्तीचे वाहनांशी अनोखे नाते असते. विशेषत: जेव्हा तो बाईक आणि मोटार घेत असेल, तर त्याला विशेष महत्त्व असते. यासाठी वाहनाची सुरक्षा ठेवण्यासाठी विमा उतरवणे गरजेचे आहे. वाहनाला एक कॉम्प्रेंन्सिव्ह मोटार इन्श्युरन्स कवचच्या रूपातून सुरक्षा असणे गरजेचे आहे. दुर्घटनेमुळे वाहनाच्या होणार्‍या नुकसानीपासून वाचवण्याचे काम विमा पॉलिसी करते. आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचे काम वाहन विमा करतात.

आता मोटारीच्या किमतीत वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम मोटार विम्याच्या हप्त्यावर पडतो. परंतु काही अतिरिक्त पैसे खर्च करून आपण आपल्या वाहनाच्या हितासाठी हमखास आर्थिक हमी मिळवू शकतोे. अर्थात हा चुकीचा व्यवहार नाही. परंतु विम्याच्या खर्च कमी करण्यासाठी काही मार्ग असून त्याचे अवलोकन करता येईल.

किमतीची तुलना करा

मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक वाहनांचा विमा उतरवणे बंधनकारक आहे. हा विमा सर्वंकष आणि महत्त्वाच्या गोष्टीला कवच देणारा असावा.

विश्वासार्ह आणि चांगली सेवा देणार्‍या विमा कंपनीकडून विमा उतरवण्याबाबत आग्रही राहावे. दाव्याच्या निपटारा करण्यात उत्तम असलेली कंपनीची निवड करावी. कंपनीकडे एक चांगले नेटवर्क आणि डिजिटल सपोर्ट असणे आवश्यक आहे. ही सिस्टीम कोणत्याही आपत्तीकाळात मोलाची मदत करेल.

पॉलिसी फिचर, प्रीमियम कॉस्ट, इन्श्युअर्ड डिक्लेयर्ड व्हॅल्यू आदींची तुलना करावी. विमा उतरवण्यासाठी लहान डिलरला सामील करण्याऐवजी थेट कंपनीच्या संकेतस्थळावरून विमा उतरवणे गरजेचे आहे.

‘अ‍ॅड ऑन’ने वाढते किंमत

काही ‘अ‍ॅड ऑन’ योजना झिरो डेप्रिशिएशन आणि रोड साइड असिस्टन्सच्या काळात उपयुक्त ठरू शकतात. मोटार इन्श्युरन्स पॉलिसीला वाढवण्यासाठी उपलब्ध विविध रायडर्सपैकी निवड करताना खबरदारी घ्यायला हवी.

अ‍ॅड ऑन आपली पॉलिसीमध्ये ओव्हरऑल प्रीमियची किंमत वाढवते.

स्पेसिफिक अ‍ॅडनिशल गरजेच्या आधारावर ग्राहकांनी मोटार इन्श्युरन्स अ‍ॅड ऑनचा पर्याय निवडायला हवा. हा पर्याय आपल्या गाडीला संपूर्णपणे सुरक्षा प्रदान करू शकतो.

‘अ‍ॅड ऑन’ हा ग्राहकांसाठी ऐच्छिक आहे. मात्र ग्राहकाच्या वाहनास कमी किमतीही चांगले कवच मिळते.

नो क्लेम बोनसची भूमिका

नो क्लेम बोनस म्हणजेच एनसीबी हे पॉलिसीच्या काळात चांगल्या ड्रायव्हिंगमुळे कोणताही दावा न केल्याने विमा कंपनीकडून ग्राहकांना दिला जाणारा बोनस असतो.

एनसीबीच्या सवलतीमुळे हप्ता बर्‍यापैकी कमी राहतो.

गाडीचे एखाद्या दुर्घटनेत किरकोळ नुकसान झाले असेल किंवा कोठे घासली असेल, तर त्याचे मूल्यांकन गाडीमालक करू शकतो.

नुकसानीचे मूल्य कमी असेल, तर आपण दावा करू नये. शेवटी पॉलिसीचे नूतनीकरण करताना एनसीबीचा वापर करून आपण सवलतीचा लाभ उचलू शकतो.

एनसीबीच्या माध्यमातून या बचतीचा उपयोग ग्राहक प्रासंगिक ‘अ‍ॅड ऑन’ खरेदी करण्यासाठी करता येईल आणि यानुसार गाडीची सुरक्षा वाढवू शकतो.

Back to top button