Indian stock market : संकटे तितक्या संधी - पुढारी

Indian stock market : संकटे तितक्या संधी

डॉ. वसंत पटवर्धन

भारतीय शेअरबाजाराचा (Indian stock market) निर्देशांक दसर्‍यानंतर रोजच सीमोल्लंघन करीत आहे. त्याने एकदा 62 हजारांचाही टप्पा ओलांडला होता. भारतीय शेअरबाजाराचा (Indian stock market) निर्देशांक दसर्‍यानंतर रोजच सीमोल्लंघन करीत आहे. त्याने एकदा 62 हजारांचाही टप्पा ओलांडला होता.गेल्या 8 महिन्यांत निर्देशांक 10 हजार पेक्षा जास्त अंकांनी वाढला होता. त्याची हीच गती कायम राहिली तर 2025 अखेर तो एक लाखापर्यंतही पोहोचलेला असेल.

सप्टेंबर अखेरच्या आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीचे कंपन्यांचे विक्रीचे व नक्त नफ्याचे आकडे जाहीर होऊ लागले आहेत. 15 फेब्रुवारी 2021 ला 52 हजारांच्या पातळीवर असलेल्या निर्देशांकाने गेल्या आठवड्यात 62 हजारांचा टप्पा ओलंडला. गेल्या 8 महिन्यांत निर्देशांकाने 19 टक्के वाढ नोंदवली आहे.

कोरोनाची साथ आता ओसरत आहे त्याचा फायदा निर्देशांकाला झाला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर नोकरांची भरती करत आहेत. येत्या वर्षभरात रोजगार 1 लक्ष 50 हजार जणांना मिळेल. त्यांच्या उत्पन्नामुळे सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) वाढत आहे. संपूर्ण वर्षाचे चित्र 1 फेब्रुवारी 2022 ला श्रीमती निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडतील, त्यात दिसेल. (Indian stock market)

ही नोकरभरती माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील चार प्रमुख कंपन्यांनी केली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, विप्रो, आणि एचसीएल टेक या त्या चार कंपन्या आहेत. इथल्या नोकरदारांचे पगार 5 आकड्यांत असतात. या चार कंपन्यांनी या आधीच्या वर्षी 82000 जणांना रोजगार दिला होता.

सेबीने सहा कंपन्यांना नुकतीच प्राथमिक समभाग विक्रीची परवानगी दिली होती. विक्रीला काढलेल्या भांडवल रकमेपेक्षा जास्त रक्कम त्यांनी बाजारातून गोळा केली. त्या कंपन्यांनी एकत्रितरीत्या अंदाजे 19 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गोळा केली. याशिवाय बाजारातील तेजी बघून आणखी 52 कंपन्या प्राथमिक समभाग विक्री करण्याच्या तयारीत होत्या.

श्रीराम ट्रान्स्पोर्ट फिनान्स आणि हिरो फिनकॉर्प 60 कोटी डॉलर्स (4200 कोटी रुपये) इतकी रक्कम परदेशातून गोळा करतील. लसीकरणामुळे अर्थव्यवस्थेला जास्त गती मिळाली. 1 कोटी पेक्षा जास्त लोकांनी लसीकरण करून घेतले आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाईफ कंपनीचा नक्त नफा आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत 48 टक्क्यांनी वाढला आहे. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार अशा खात्यातील व्यवहार 65.8 टक्के मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून होत आहेत.

सर्वसमावेशक आर्थिक विकासाचे लक्ष्य अजून पूर्ण झाले नसल्यामुळे त्यासाठी कसून प्रयत्न करण्यास केंद्र सरकारने सरकारी क्षेत्रातील बँकांना सांगितले आहे. त्याचबरोबर पेन्शन व विमा संरक्षणाचाही विस्तार करण्याचे आदेश सरकारने बँकांना दिले आहेत. सणासुदीच्या सध्याच्या दिवसात कर्जदारांना बँकांनी जास्त रक्कम उपलब्ध करून द्यावी, असेही सांगण्यात आले आहे. (Indian stock market)

कोरोना काळात अडीअडचणीला हाती पैसा असावा, अशा उद्देशाने ग्राहकांनी मुदतठेवींमध्ये जास्त रकमा ठेवण्यास सुरुवात केली आहे. ‘जितकी संकटे जास्त तितक्या संधी जास्त’ ही म्हण आता खरी ठरू बघत आहे. सध्या पैसे ठेवीत घालण्याचा कल जास्त असल्यामुळे बँकांकडून दिल्या जाणार्‍या कर्जाची गती मंद झाल्याचे दिसते.

प्राप्तिकर विभागाने चालू आर्थिक वर्षात (2021-022) 18 ऑक्टोबरपर्यंत 63.23 लाख करदात्यांना 92 हजार 961 कोटी रुपयांची रक्कम परत केली आहे. (Income Tax Refund) एकूण परत केलेल्या रकमेपैकी व्यक्तिगत करदात्यांना 23,026 कोटी रुपये परत केले आहेत. तर कार्पोरेट करदात्यांना 69,934 कोटी रुपये परत केले आहेत.

महाराष्ट्र बँकेच्या सप्टेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीचा नफा दुप्पटीने वाढून 264 कोटी रुपयापर्यंत गेला आहे. गतवर्षीच्या याच तिमाहीत बँकेला 130 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.

Back to top button