Stock Market Opening | सेन्सेक्स, निफ्टीची सावध सुरुवात, जाणून घ्या कारण | पुढारी

Stock Market Opening | सेन्सेक्स, निफ्टीची सावध सुरुवात, जाणून घ्या कारण

Stock Market Opening : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे आरबीआयच्या पतधोरण निर्णयाकडे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. परिणामी, शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने आज मंगळवारी स्थिर पातळीवर सुरुवात केली. सेन्सेक्स १२८ अंकांच्या वाढीसह ६०,६३५ वर तर निफ्टी १७,८०० वर खुला झाला आहे. सुरुवातीच्या व्यवहारात येस बँक, अदानी पोर्टस्, पंजाब नॅशनल बँक, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, ॲक्सिस बँक, टीसीएस, रिलायन्स, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स हे वधारले होते.

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून घसरण झालेल्या अदानी एंटरप्रायझेसचा शेअर सुमारे ४ टक्क्यांनी वाढला आहे. अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर हे शेअर ५ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. टाटा स्टीलचा शेअर ३ टक्क्यांनी खाली आला आहे. व्होडाफोन आयडियाचा शेअरही ०.६१ टक्क्याने घसरला आहे.

आज मंगळवारी आशियाई बाजार हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक ७.३७ अंकांनी म्हणजे ०.२३ टक्के वाढून ३,२४६ वर, जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ६० अंकांनी वाढून २७,७५४ वर गेला आहे. (Stock Market Opening)

हे ही वाचा :

Back to top button