Stock Market Today | सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टी तेजीत

Stock Market Today : जागतिक सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी (दि. २४) भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. तिसर्या तिमाहीतील कॉर्पोरेट कंपन्यांच्या मजबूत कमाईचाही शेअर बाजारातील तेजीला आधार मिळाला आहे. आज सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २३० अंकांनी वाढला होता. त्यानंतर सकाळी ११ च्या सुमारास १८० अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स ६१,१०० वर होता. तर निफ्टी १८,१०० वर व्यवहार करत होता.
बँकांनी बुडीत कर्जे आटोक्यात आणून वसुलीत सुधारणा केली आहे. या पार्श्वभूमीवर फायनान्शियल शेअर्स वधारले. माहिती तंत्रज्ञान निर्देशांकही तेजीत व्यवहार करत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात येस बँक, ॲक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक, टाटा मोटर्स, टाटा स्टील, आयडीएफसी फर्स्ट बँक, आयसीआयसीआय बँक यांचे शेअर वाढले होते.
अमेरिकेच्या शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सोमवारी तेजीत बंद झाले होते. या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत.
हे ही वाचा :
- Stock Market Updates | दोन सत्रांतील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स ३१९ अंकांनी वाढून ६०,९४१ वर बंद
- अर्थसंकल्पात करविषयक नव्या घोषणांची अपेक्षा