जुलैनंतर सोन्याची मागणी वाढणार | पुढारी

जुलैनंतर सोन्याची मागणी वाढणार

सोने-चांदीच्या भावात सध्या चढउतार चालू असली तरी गुंतवणूकदारांनी विचलित होण्याचे अजिबात कारण नाही. या क्षेत्रातील तज्ञांच्या मते, या वर्षाच्या अखेरीस सोन्याचा प्रती 10 ग्रॅम दर 55 हजार रुपयांवर जाऊ शकतो.

आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (कमॉडीटी अँड करन्सी) अनुज गुप्‍ता यांच्या म्हणण्यानुसार, सध्या अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी कमी झाली आहे.

याशिवाय डॉलर मजबूत झाल्यानेही त्याचा किमतीवर परिणाम होणे अपरिहार्य आहे. त्यामुळे सोन्याच्या भावात चढउतार पाहायला मिळतो. जुलैनंतर सराफा बाजारपेठेत सोन्याची मागणी वाढेल. त्यांनतर वर्षाअखेर त्याचा दर 55 हजारांपर्यंत जाईल.

देशात सोन्याची आयात चालू आर्थिक वर्षात (2021-22) एप्रिल आणि मेमध्ये वाढून 6.91 अब्ज डॉलर (51 हजार कोटी रुपये) झाली. 2020-21 या आर्थिक वर्षात याच कालावधीत ही आयात 7.91 कोटी डॉलर्स (599 कोटी रुपये) होती. सरत्या सप्‍ताहात सोने 375 रुपयांनी वाढून 47,587 रुपयांपर्यंत गेले होते.

चालू आर्थिक वर्षात (2021-22) एप्रिल ते मे या काळात देशातील सोन्याची आयात वाढून 6.91 अब्ज डॉलर (51 हजार कोटी रुपये) झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2020-21 आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत या सोन्याची आयात 7.91 कोटी डॉलर्स (599 कोटी रुपये) होती.

देशात वाढत्या मागणीमुळे सोन्याची आयात वाढू लागली आहे. एप्रिलमध्ये 6.3 अब्ज डॉलर्सची म्हणजेच 46 हजार कोटी रुपयांची आयात झाली आहे.

Back to top button