Share Market Today | सेन्सेक्स सलग दुसऱ्या दिवशी घसरला | पुढारी

Share Market Today | सेन्सेक्स सलग दुसऱ्या दिवशी घसरला

Share Market Today : जागतिक बाजारातील संकेत संमिश्र आहेत. यामुळे आशिया-पॅसिफिकमधील शेअर सकाळच्या व्यवहारात वधारले. अमेरिकेतील शेअर बाजारातील मुख्य निर्देशांक गुरुवारी घसरले होते. दरम्यान, भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स सलग दुसऱ्या दिवशी घसरला. सेन्सेक्स ८७ अंकांनी खाली येऊन ६१,६६३ वर बंद झाला. तर निफ्टी ३६ अंकांनी घसरून १८,३०७ वर बंद झाला. तर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ६ पैशांनी घसरून ८१.७० वर बंद झाला. बीएसईवर १,४४८ शेअर्स वाढले तर २,०५४ शेअर्स घसरले. BSE सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल (m-cap) २८२.३४ लाख कोटी रुपयांवर आले आहे. शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १५० अंकांनी वाढून खुला झाला होता. तर निफ्टी १८,४०० वर होता. त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण दिसून आली.

सुरुवातीच्या व्यवहारात एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, एचडीएफसी लाईफ आणि अदानी एंटरप्रायझेस यांचे शेअर्स निफ्टीवर वधारले. तर एम अँड एम, हिरो मोटोकॉर्प, टायटन कंपनी, ओएनजीसी आणि नेस्ले इंडियाचे शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

जपानचा निक्केई २२५ निर्देशांकाने अंशतः वधारून व्यवहार केला. दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.७५ टक्क्यांनी वाढला आहे. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक ०.७ टक्क्यांनी वाढून वर गेला आहे. तर चीनमधील शांघाय कंपोझिट स्थिर पातळीवर आहे. अमेरिकेतील डाऊ जोन्स ०.०२ टक्क्यांनी घसरला. S&P 500 निर्देशांक ०.३१ टक्क्यांनी आणि नॅस्डॅक निर्देशांक ०.३५ टक्क्यांनी घसरला आहे. (Share Market Today)

दरम्यान, भारतीय शेअर बाजारात गुरुवारी घसरण दिसून आली. सेन्सेक्स २३० अंकांनी घसरून ६१,७५० वर बंद झाला. तर निफ्टी ६५ अंकांनी घसरून १८,३४३ वर आला. बीएसईवर १,५१८ शेअर्स वाढले तर १,९९१ घसरले.

हे ही वाचा :

Back to top button