Stock Market | शेअर बाजारात तेजीचा वारू कायम; सेन्सेक्सची ६१ हजारांवर उसळी
मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात (Stock Market) तेजी दिसून येत आहे. मंगळवारी बाजार खुला होताच सेन्सेक्स ३६५ अंकांनी वाढून ६१ हजारांवर गेला. तर निफ्टी सुमारे १०० अंकांनी वधारुन १८,१०० वर पोहोचला होता. सुरुवातीच्या व्यवहारात Nykaa चे शेअर्स ४ टक्क्यांनी वधारले तर Tata Steel चे शेअर्स २ टक्क्यांनी घसरले होते. दरम्यान, सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ७ पैशांनी वाढून ८२.७४ वर पोहोचला. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, डॉ. रेड्डीज लॅब्स, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि अपोलो हॉस्पिटल्स हे निफ्टीवरील प्रमुख लाभधारक होते.
निफ्टी मिडकॅप १०० आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक ०.३ टक्के पर्यंत वाढले. दरम्यान, निफ्टी मेटल इंडेक्स वगळता निफ्टी बँक आणि निफ्टी फार्मा निर्देशांक जवळपास १ टक्क्यापर्यंत वाढल्याने सर्व क्षेत्र हिरव्या रंगात व्यवहार करत होते. HDFC बँक लिमिटेच्या शेअर्समध्ये सलग तिसऱ्या सत्रात वाढ झाली आहे. हे शेअर २.२७ टक्क्याने वाढले.
आशियाई बाजारातील सकारात्मक संकेत आणि या आठवड्यात होणाऱ्या अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक बैठकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही निर्देशांक मंगळवारी वधारले आहेत. रिलायन्स, बँकिंग आणि आयटी शेअर्स तेजीत दिसत आहेत. निफ्टीवरील IT कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात होते. टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीस, टेक महिंद्रा यांच्या शेअर्समध्ये प्रामुख्याने वाढ झाली आहे.
दिवाळीनंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजीचा वारू वेगाने दौडल्याने सेन्सेक्सने सोमवारी ६० हजारांवर उसळी घेतली होती. परिणामी, गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. सोमवारचा बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ७८६ अंकांनी वधारला, तर राष्ट्रीय शेअर बाजारांतर्गत निफ्टीत २२५ अंकांनी वाढ झाली होती. सेन्सेक्समधील कालची वाढ ही १.३१ टक्के होती. सेन्सेक्स तब्बल ६० हजार ७४६ वर पोहोचला होता. निफ्टीत १.२७ टक्क्याची वाढ होऊन तो १८,०१२ अंकांवर धडकला होता. शेअर बाजारात एकूण १ हजार ७८८ शेअर्समध्ये वाढ झाली होती, तर १ हजार ६५७ शेअर्समध्ये घसरण झाली होती. (Stock Market)
01.11.2022
Sensex opens at 61065 with a gain of 318 points pic.twitter.com/POMDtnAZkU— BSE India (@BSEIndia) November 1, 2022
हे ही वाचा :
- Stock Market : भारतीय शेअर बाजारात तेजी कायम
- तयार रहा! 4 कंपन्यांच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी, जाणून घ्या…