Stock Market Today | भारतीय शेअर बाजार सलग चौथ्या सत्रात वधारला, सेन्सेक्स ६० हजारांच्या दिशेने | पुढारी

Stock Market Today | भारतीय शेअर बाजार सलग चौथ्या सत्रात वधारला, सेन्सेक्स ६० हजारांच्या दिशेने

Stock Market Today : भारतीय शेअर बाजार सलग चौथ्या सत्रात वधारला. मंगळवारी (दि.१९) सेन्सेक्स ३२७ अंकांनी वाढून ५९,२०० वर खुला झाला. तर निफ्टीही वधारुन १७,५०० वर व्यवहार करत आहे. एकूणच बाजारात सकारात्मक वातावरण दिसून येत असून सेन्सेक्सची झेप ६० हजारांच्या दिशेने सुरु आहे.

आशियाई शेअर बाजारात तेजी

बुधवारी आशियाई शेअर बाजारात तेजी होती. टोकियोचे शेअर्स बुधवारी उच्च पातळीवर खुले झाले. बेंचमार्क Nikkei २२५ निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात ०.३५ टक्के म्हणजेच ९५.५६ अंकांनी वाढून २७,२५१.७० वर पोहोचला. तर टॉपिक्स निर्देशांक ०.१२ टक्के म्हणजेच २.३१ अंकांनी वाढून १,९०३ वर पोहोचला.

क्रिप्टोकरन्सी घसरल्या

बुधवारी सकाळी क्रिप्टोकरन्सीच्या किमती पुन्हा घसरल्या. यामुळे जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप ०.५९ टक्क्यांनी घसरले. जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप ९२९.०३ अब्ज डॉलरवर आले आहे. बिटकॉइन १९,३१६ वर व्यवहार करत आहे आणि त्यात १.१२ टक्क्यांनी घसरण झाली आहे. इथेरियम ब्लॉकचेन नेटवर्कचे मूळ टोकन इथर १.९१ टक्क्यांनी घसरुन १,३०६ डॉलरवर व्यवहार करत आहे. (Stock Market Today)

आशियाई बाजारातील तेजी तसेच आरबीआयने महागाई कमी होण्याचे दिलेले संकेत यामुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजार वधारला होता. काल मंगळवारी (दि.१८) सेन्सेक्स ५४९ अंकांनी वधारून ५८.९६० वर बंद झाला होता. तर निफ्टी १७५ अंकांनी वाढून १७,४८६ वर बंद झाला होता.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) व्याजदर वाढ थांबवावी, असे चलनविषयक धोरण समितीचे सदस्य जयंत वर्मा यांनी सोमवारी एका मुलाखतीत म्हटले होते. आरबीआयने सोमवारी आपल्या मासिक बुलेटिनमध्ये म्हटले होते की, देशाचा किरकोळ महागाई दर सप्टेंबरमधील ७.४१ टक्क्याच्या उच्चांकावरून कमी होईल. RBI च्या अंदाजानंतर लगेच जयंत वर्मा यांनी व्याजदर वाढ थांबवण्याचा सूर व्यक्त केला होता. यामुळे शेअर बाजारात सकारात्मक वातावरण तयार होत आहे.

हे ही वाचा :

Back to top button