Gold Rate Today | दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करताय? जाणून घ्या आजचे दर | पुढारी

Gold Rate Today | दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करताय? जाणून घ्या आजचे दर

Gold Rate Today : दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने– चांदी दरात वाढ झाली आहे. बुधवारी (दि.५) सकाळच्या व्यवहारात २४ कॅरेट सोन्याच्या दरात ५५० रुपयांची वाढ झाली. यामुळे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५१,६६० रुपयांवर गेला आहे. तर चांदीचा दर ४,४०० रुपयांनी वाढून प्रति किलो ६१,८०० रुपयांवर पोहोचला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ५०० रुपयांनी वाढून ४७,३५० रुपये झाला आहे.

मुंबई आणि कोलकाता येथे २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५१,६६० रुपये आहे. या ठिकाणी २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,३५० रुपये आहे. दिल्लीत २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे ५१,८२० रुपये आणि ४७,५०० रुपये आहे. चेन्नईत २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे ५२,१०० रुपये आणि ४७,७५० रुपये आहे. (Gold Rate Today)

मुंबई, दिल्ली, कोलकाता येथे चांदीचा दर प्रति किलो ६१,८०० रुपये आहे. तर चेन्नई, बंगळूर, हैदराबादमध्ये चांदीचा दर ६६,७०० रुपयांवर गेला आहे. स्पॉट चांदीचा दर ०.८ टक्क्यांनी घसरून प्रति औंस २०.९५ डॉलरवर आला आहे. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)

भारतातील सोन्याचा पुरवठा कमी केला

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर मागील सत्रातील घसरणीतून सावरत डॉलर काहीसा स्थिरावल्याने बुधवारी सोन्याचे भाव कमी झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस १,७०० डॉलरच्या वर होता. सोन्याचा पुरवठा करणार्‍या बँकांनी चीन, तुर्कस्तान आणि इतर बाजारपेठांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी भारतातील पुरवठा कमी केला आहे.

शुद्ध सोन्याची पारख कशी कराल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

Back to top button