Gold Prices Today | दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने तेजीत, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर | पुढारी

Gold Prices Today | दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने तेजीत, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर

Gold Prices Today : दसऱ्याच्या मुहुर्तावर सोने खरेदी केली जाते. पण या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात तेजी आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने- चांदी तेजीत असल्याने देशातील सराफा बाजारातही दराने उसळी घेतली आहे. शुद्ध सोन्याचा म्हणजे २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५१,१६९ रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदी प्रति किलो ६१,१४४ रुपयांवर व्यवहार करत आहे.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,१६९ रुपये, २३ कॅरेट ५०,९६४, २२ कॅरेट ४६,८७१ रुपये, १८ कॅरेट ३८,३७९ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २९,९३४ रुपयांवर खुला झाला आहे. काल सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,३८७ रुपयांवर बंद झाला होता. त्यात आज ७८२ रुपयांनी वाढ झाली. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा दर ५६,२०० रुपयांवर गेला होता. सध्याचा दर हा दोन वर्षाच्या तुलनेत ५,०३१ रुपयांनी कमी आहे. तर चांदी कालच्या तुलनेत आज ३,८२७ रुपयांनी महागली आहे. (Gold Prices Today)

शुद्ध सोन्याची पारख कशी कराल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

Back to top button