Gold Prices Today | ऐन सणासुदीत सोने पुन्हा ५० हजारांच्या पार | पुढारी

Gold Prices Today | ऐन सणासुदीत सोने पुन्हा ५० हजारांच्या पार

Gold Prices Today : नवरात्रीच्या चौथ्या दिवशी सराफा बाजारात सोन्याने पुन्हा एकदा उसळी घेतली. सोन्याची किंमत पुन्हा ५० हजारांच्या पार गेली आहे. सोन्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे शुद्ध सोन्याचा म्हणजे २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५०,०१० रुपयांवर पोहोचला आहे. सोन्यासह चांदीच्या भावातही ९०० रुपयांहून अधिक तेजी दिसून येत आहे. चांदीचा प्रति किलो दर ५५,४४५ रुपये आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.२९) २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५०,०१० रुपये, २३ कॅरेट ४९,८१० रुपये, २२ कॅरेट ४५,८०९ रुपये, १८ कॅरेट ३७,५०८ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २९,२५६ रुपयांवर खुला झाला होता.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर सोने ५०,१०३ रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे, तर चांदीचा दर प्रति किलो ५६,४१५ रुपयांवर आला आहे. सध्या सोन्याचा दर वाढला असला तरी पुढील काही दिवसांत सोन्याचा दर ४८ हजारांवर येण्याची शक्यता सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गेल्या तीन दिवसांत सोन्याच्या दरात घसरण पहायला मिळाली होती. आज गुरुवारी सोन्याच्या दराने उसळी घेतली. (Gold Prices Today)

शुद्ध सोन्याची पारख कशी कराल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

Back to top button