Gold Prices Today | सोन्याचा दर ७ महिन्यांच्या निचांकी पातळीवर, जाणून घ्या किती रुपयांनी झाले स्वस्त | पुढारी

Gold Prices Today | सोन्याचा दर ७ महिन्यांच्या निचांकी पातळीवर, जाणून घ्या किती रुपयांनी झाले स्वस्त

Gold Prices Today : अमेरिकेने फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात वाढ केल्याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. आज भारतात देखील सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. MCX वर सोन्याच्या फ्यूचर्स ट्रेडमध्ये ते ०.२५ टक्क्याने खाली येऊन प्रति १० ग्रॅम ४९,३२१ रुपयांवर आले. हा दर ७ महिन्यांतील निचांकी आहे, तर चांदी ०.४ टक्के घसरून प्रति किलो ५७,०५९ रुपयांवर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या स्पॉट किमतीत १ टक्के घसरण होऊन दर १,६५६ डॉलर प्रति औंसवर आला.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात ७५ बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. त्याचा परिणाम रुपयासह सोन्याच्या दरावर झाला आहे. अमेरिका ट्रेझरी बॉन्ड उत्पन्नात ४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. २००७ नंतरची ही सर्वाधिक वाढ आहे. तसेच डॉलरचा निर्देशांक दोन दशकांच्या नवीन उच्चांकावर पोहोचला आहे.

सोन्याला महागाईपासून बचाव करण्याचे माध्यम मानले जाते. पण महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदरात केलेल्या वाढीमुळे सोने साठ‍वून ठेवण्याचा खर्च वाढला आहे. दरम्यान, स्पॉट सिल्व्हरचा दर १.७ टक्क्याने घसरून १९.२६ डॉलर प्रति औंसवर आला आहे. सोन्याच्या किमतीत घसरण झाली असताना गुंतवणूकदार खरेदीसाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे.

Gold Prices Today असे ओळखा शुद्ध सोने?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

 हे ही वाचा :

Back to top button