अर्थज्ञान : गुंतवणूक निगेटिव्ह कम्पाऊडिंग झाल्यास…

अर्थज्ञान :  गुंतवणूक निगेटिव्ह कम्पाऊडिंग झाल्यास…
Published on
Updated on

विधिषा देशपांडे :  शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांत चढउतार सुरू असतानाही गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावर विश्‍वास कायम राहिला आहे. महागाई आणि वाढते व्याजदर अशा वातावरणात सलग 17 व्या महिन्यांत जुलै 2022 मध्ये इक्‍विटी स्कीम्समध्ये इनफ्लो पाहावयास मिळाले आहे.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या आकडेवारीनुसार एसआयपीच्या माध्यमातून गेल्या महिन्यांत सुमारे 12,140 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. जूनमध्ये हाच आकडा 12,276 कोटी रुपये होता. याशिवाय जुलै महिन्यांत एसआयपी खात्याची संख्या 5.61 कोटी होती आणि ती विक्रमी मानली जात आहे. मासिक एसआयपीच्या योगदानाचे मूल्य 12000 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गुंतवणुकीचा वाढता फ्लो पाहता, म्युच्युअल फंडाबाबत गुंतवणूकदारांचा उत्साह दिसून येतो. हायब्रीड फंड्स वगळता म्युच्युअल फंडाच्या सर्व श्रेणीत सकारात्मक संकेत मिळत आहेत. येत्या काही तिमाहीत रिकव्हरी अधिक वेगाने होईल, असा अंदाज आहे.
दीर्घकाळापर्यंत म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक राहत असेल, तर कम्पाऊडिंगचा जबरदस्त फायदा मिळतो. पण अनेकदा गुंतवणूकदारांना त्याच्या विपरीत परिस्थितीला सामोरे जावे लागते. यास 'निगेटिव्ह कम्पाऊडिंग' असे म्हटले जाते. तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदार पोर्टफोलिओबाबत सतर्क असतील तर ते निगेटिव्ह कम्पाऊडिंगपासून बचाव करू शकतात.

वेल्थ क्रिएशनमध्ये कम्पाऊडिंगची पॉवर नेहमीच कामाला येते. मात्र, गुंतवणूकदारांनी निगेटिव्ह कम्पाऊडिंगपासून वाचविण्यासाठी वेळोवेळी उपाय करायला हवेत. एक उदाहरण पाहूया. आपल्या पोर्टफोलिओत दोन योजना असतील आणि त्यात एका योजनेतून वार्षिक परतावा 5 टक्के असेल आणि दुसर्‍या योजनेने याच कालावधीत 25 टक्के परतावा दिला असेल, तर त्याचा अर्थ आपला नेट रिटर्न हा सुमारे 20 टक्के निगेटिव्ह राहिला आहे, असे समजावे. याचाच अर्थ, आपल्या एका योजनेतून कम्पाऊडिंगचा जबरदस्त फायदा होत असताना, दुसर्‍या योजनेने तो फायदा गिळकृंत केला आहे. आपला पैसा वाढण्याऐवजी कमी होऊ लागला आहे.

योजनेतून असे बाहेर पडा

गुंतवणूकदाराकडून एक सामान्य चूक होते, ती म्हणजे चांगला परतावा देणार्‍या योजनेतून नफा काढून घेतात. परंतु ज्या योजनेतून नकारात्मक परतावा येत असेल तेथे गुंतवणूक सुरू ठेवतात. आज ना उद्या तेथून चांगला परतावा मिळेल, अशी अपेक्षा ठेवतात. परंतु आपण उलट कृती करायला हवी. पोर्टफोलिओ कमकुवत करणार्‍या योजनेतून बाहेर पडणे सयुक्‍तिक ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news