Gold price today : सोने महागले, चांदी स्वस्त, जाणून घ्या नवे दर | पुढारी

Gold price today : सोने महागले, चांदी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

पुढारी ऑनलाईन डेस्क : सराफा बाजारात सोन्याच्या दरात (Gold price today) तेजी कायम आहे. आज शुक्रवारी सोन्याने ५२ हजारांचा टप्पा ओलांडला. सराफा बाजारात आज शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५२,१४० रुपयांवर खुला झाला. काल गुरुवारी सोन्याचा दर ५२,०३९ रुपयांवर जाऊन बंद झाला होता. आज त्यात आणखी वाढ झाली. मात्र, चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीचा दर २१९ रुपयांनी कमी झाला आहे. पुढील काही दिवसांत सोने आणखी महागण्याची शक्यता असल्याचा अंदाज सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशनच्या माहितीनुसार, आज शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१४० रुपये, २३ कॅरेट ५१,९३१ रुपये, २२ कॅरेट ४७,७६० रुपये, १८ कॅरेट ३९,१०५ रुपये आणि १४ कॅरेट ३०,५०२ रुपये होता. चांदीचा दर प्रति किलो ५७,८३८ रुपयांवर खुला झाला आहे. चांदी २१९ रुपयांनी स्वस्त झाली आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार (Good Returns website) मुंबई आणि कोलकाता येथे (Gold price today) २२ कॅरेट १० ग्रॅम सोने ४७,५०० रुपयांना विकले जात आहे. याच कॅरेट सोन्याचा दिल्लीतील दर ४७,६५० रुपये एवढा आहे. चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ४८,२५० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याची किंमत ४८,२५० रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने- चांदी दरात वाढ होत असल्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसून येत आहे. यामुळे सोन्याचे दर वाढत असल्याचे दिसून येत आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

Back to top button