आयटीआर : शेवटची तारीख ३१ जुलै, वेळ पाळा, दंड वाचवा | पुढारी

आयटीआर : शेवटची तारीख ३१ जुलै, वेळ पाळा, दंड वाचवा

प्राप्तिकर विवरण भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. शेवटच्या तारखेला पोर्टलवर अधिक भार येऊ शकतो आणि परिणामी पोर्टल वेगाने काम करण्याचे थांबवतो. त्यामुळे आयटीआर भरण्यापासून आपण वंचित राहता.

जुलैचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. यात नोकरदार, करदाते आयटीआर भरण्यास व्यग्र राहतात. 2021-22 साठी रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. त्याचवेळी ज्यांचे बिझनेसाठी ऑडिट आवश्यक असते, त्यांच्यासाठी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे. त्याचवेळी ट्रान्सफर प्रायसिंग रिपोर्टची गरज असणार्‍या व्यावसायिकांसाठी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे रिटर्न भरण्यास मुदतवाढ दिली. परंतु यंदा

मुदतवाढ मिळण्यास ठोस कारण दिसत नाही. शेवटी प्रत्येकाने आपले प्राप्तिकर विवरणपत्र वेळेत भरले जाईल, याची काळजी घेतली पाहिजे.

शेवटच्या तारखेचा विचार नको

नोकरदार वर्गासाठी प्राप्तिकर विवरण दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. जर आपण नोकरदार असाल, तर आपल्या कंपनीकडून तत्काळ फॉर्म 16 घ्यावा आणि रिटर्न भरून टाका. रिटर्न भरण्याच्या शेवटच्या दिवसांत प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना घडलेल्या आहेत. शेवटी रिटर्न भरण्याची तारीख निघून जाते. त्यामुळे करदात्यांना अकारण दंडाचा सामना करावा लागू शकतो.

रिटर्न फॉर्मची निवड

रिटर्न दाखल करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉर्मची निवड. आर्थिक वर्ष 2021-22 आणि असेसमेंट इअर 2022-23 रिटर्न दाखल करताना आपले रिटर्न योग्य रितीने भरले जात आहे की नाही, हे तपासून पाहावे. जर आपण रिटर्न फॉर्म योग्य रितीने भरले नाही, तर तो नामंजूर होऊ शकतो. त्यामुळे रिटर्न पुन्हा भरण्याची वेळ आली तर दंड आकारला जू शकतो. शेवटच्या तिथीनंतर रिटर्न भरताना दंडाबरोबरच करावर व्याज आकारणीदेखील होऊ शकते. उदा. जर आपण नोकरदार असाल आणि आपल्या 2021-22 या आर्थिक वर्षांत एकूण उत्पन्न 50 लाख रुपये असेल, तर आपल्याला फॉर्म-1 भरावे लागेल. निवृत्तीवेतन धारकांनीदेखील या फॉर्मची निवड करावी. बँकमध्ये जमा होणारे व्याज आणि एखाद्या मालमत्तेपासून मिळवणार्‍या मंडळींनी याच फॉर्मच्या आधारे रिटर्न दाखल करावे लागेल. फॉर्म-2 हा अशा नोकरदारांसाठी आहे की, त्यांना वेतनाशिवाय अन्य स्रोतांकडून नियमित उत्पन्न मिळते.

फॉर्म-3 म्हणजे आयटीआर-3 हा अशा लोकांसाठी आहे की, आयटीआर-2 साठी निश्चित केलेल्या स्रोतांपासून उत्पन्न मिळवण्याबरोबरच एखादा व्यवसायातूनही उत्पन्न मिळवत असाल, तर अशा मंडळींनी आयटीआर-3 भरावे लागेल. एखाद्या कंपनीत भागीदार असल्यास आयटीआर-3 भरावे लागेल. याप्रमाणे आयटीआर-4 हा अशा मंडळींसाठी आहे की, तो रेसिडेन्ट इंडिव्हिज्युअल, एचयूएफ आणि 50 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या फर्म आणि बिझनेस व व्यवसायातून उत्पन्न होत असेल, तर अशा लोकांना फॉर्म-4 आहेत. नोकरदार आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी फॉर्म-1 च्या माध्यमातून आयटीआर दाखल करावे.

कोणते कागदपत्रे आवश्यक

नोकरदार वर्गाना रिटर्न दाखल करण्यासाठी पॅन क्रमांक, आधार कार्ड, बँक खात्याचे वार्षिक विवरण, गुंतवणूक, अन्य स्रोतांपासून होणार्‍या उत्पन्नाचे पुरावे द्यावे लागतील. ऑनलाईन रिटर्न दाखल करताना या कागदपत्रांना रिटर्नबरोबरच अपलोड करावे लागेल.

परदेशातील बँक खात्याचे विवरण द्या

ज्या करदात्यांचे परदेशात बँक खाते आहेत किंवा तेथे गुंतवणूक आणि मालमत्ता असेल, तर त्यांनादेखील रिटर्न भरताना त्याचे विवरण भरणे गरजेचे असते. अन्यथा दंड भरावा लागेल. अनिवासी भारतीय जेव्हा भारतात येऊन वास्तव्य करतात आणि निवासी म्हणून रिटर्न दाखल करतात, तेव्हा त्यांनी या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे.

फॉर्म-16 शिवाय भरा रिटर्न

नोकरदारवर्गासाठी रिटर्न भरताना फॉर्म-16 एक महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. कर कपात होऊनही एखाद्याला फॉर्म-16 मिळत नसेल, तर या स्थितीत मासिक भत्त्यावर मिळालेल्या करकपातीचा लाभ जाणून घेताना अडचणी येऊ शकतात. तरीही आपण आयटीआर भरू शकता. जर आपण नोकरदार असाल, तर आपण सॅलरी स्लिप, भाड्याच्या पावत्या, बँक हप्ता विवरण आणि अन्य खर्चांच्या कागदपत्रांच्या आधारे फॉम-16 नसतानाही रिटर्न भरू शकता.

व्यापार्‍यांनीदेखील रिटर्न भरावे

वार्षिक उत्पन्न 60 लाखांपेक्षा अधिक असणार्‍या व्यापार्‍यांनी किंवा व्यवसायातून दहा लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळत असेल, तर आपल्याला रिटर्न भरणे गरजेचे आहे. तसेच 60 पेक्षा कमी वयोगटातील व्यक्तीला वर्षभरात टीडीएस किंवा टीडीएसच्या रूपाने एकूण 25 हजार रुपयांची कपात झाली असेल, तर त्यालाही रिटर्न भरावे लागते. तसेच 60 पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचा टीडीएस 50 हजारांपेक्षा अधिक कापला जात असेल, तर त्यालाही रिटर्न भरावा लागतो.

सत्यजित दुर्वेकर

Back to top button