फसव्या लिंकपासून सावध राहा

फसव्या लिंकपासून सावध राहा
Published on
Updated on

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. हॅकर किंवा फसवणूक करणारे लोक एसएमएसद्वारे, मेलद्वारे फसवी लिंक पाठवतात आणि त्याचा थांगपत्ता युजरलाही लागत नाही. संबंधित लिंक क्लिक करताच आपल्या फोन किंवा संगणकावर असा एक मालवेअर डाऊनलोड होतो की, काही सेंकदातच आपले खाते रिकामे होते.

अनोळखी लिंकवर क्लिक नको

आपण सर्वच जण इंटरनेटवर विश्वास ठेवतो. सर्च इंजिनवरील असलेल्या एखाद्या कंपनीचा किंवा सेवा संस्थेच्या लिस्टेड नंबरवर विश्वास ठेवतो आणि कॉल करतो. परंतु एखाद्या व्यक्तीने मोबाईलवर किंवा मेलवर पाठवलेल्या अनोळखी लिंकला जेव्हा क्लिक करतो, तेव्हा ती मोठी चूक ठरते. हॅकर आपल्या घाईचा आणि निष्काळजीपणाचा गैरफायदा उचलतो. अशा स्थितीत कोणती लिंक खरी आहे आणि कोणती फ्रॉड, यात फरकदेखील करता येत नाही. सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी यांनी अशा प्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगितले.

अशी करा खातरजमा

हॅकर किंवा ठगवणारे लोक हे युजरला अशी लिंक पाठवतात की, त्याला क्लिक करताच आपल्या मोबाईलमध्ये किंवा डेस्कटॉपवर असा मालवेअर डाऊनलोड होतो की, काही सेंकदातच आपले खाते रिकामे होते. म्हणून फसवणुकीच्या जाळ्यात न अडकण्यासाठी बनावट लिंक कशी ओळखावी, याबाबत काही टिप्स सांगता येईल.

टिप्सचे पालन करा

• सर्वप्रथम प्रत्येक लिंकला क्लिक करण्याची सवय सोडून द्या.
• ऑनलाईन नंबरवर कंपनीचे काय नाव आहे, हे जाणून घ्या. ठग मंडळी खर्‍या कंपनीशी मिळतेजुळते नाव ठेवतात. त्याचे स्पेलिंग चुकीचे असते आणि डोमेन नाव अनोळखी असते.
• संकेतस्थळ खरे आहे की खोटे, हे तपासून पाहा. प्रत्येक सर्च करताना तीन डॉटवर क्लिक करण्यास विसरू नका. या कृतीने संकेतस्थळाची खातरजमा होते.
• लिंक क्लिक करण्यापूर्वी पहिले नॉर्टनसारख्या एखाद्या लिंकवर क्लिक करून ती लिंक खरी आहे की खोटी, ते पाहा.
• गुगल किंवा अ‍ॅपलकडून बनावट संकेतस्थळाबाबत सातत्याने इशारे दिले जातात. त्याकडे दुर्लक्ष करू नका.
• आपल्याला एखादा मेल आला असेल, तर त्याचा आयडी तपासून पाहा आणि यात कंपनीचे नाव खरे आहे की खोटे हे पाहा.
• शॉर्ट यूआरएलवर क्लिक करण्यापूर्वी लिंक प्रीव्ह्यू पाहा आणि नंतरच क्लिक करा.
• मेसेज किंवा मेलवर आलेल्या फाईलला क्लिक करून ती फाईल डाउनलोड करू नका. अशा कोणत्याही लिंकला अँटी व्हायरसवर तपासूनच डाऊनलोड करावे.
• बनावट लिंकला क्लिक करण्यापूर्वी पुरेशी खबरदारी घ्या. या सावधगिरीने फसवणुकीपासून दूर राहाल.
• सार्वजनिक इंटरनेट कॅफेवर ऑनलाईनवर काम करण्याचे टाळा.

जगदीश काळे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news