शेअर बाजारातील पडझडीचा अन्वयार्थ | पुढारी

शेअर बाजारातील पडझडीचा अन्वयार्थ

लक्ष्मीची पाऊले-डॉ. वसंत पटवर्धन

गेल्या आठवड्यातला सोमवार हा ‘काळा सोमवार’ म्हणूनच गणला जाईल. रशिया-युक्रेनचे युद्ध, वाढती महागाई व जगभरातील कोसळलेले शेअर बाजार, घसरता रुपया अशा अनेक घटनांनी सोमवार जास्त काळा झाला होता. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने आपला फेडरल बँक दर वाढवण्याचे संकेत दिले आणि भारताच्या रिझर्व्ह बँकेनेही दरवाढीचे संकेत दिले. त्याचवेळी विदेशी गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर काढून घेतली. या सर्वांमुळे काळ्या सोमवारची पडझड डोळ्यात जास्त भरली. एकाच दिवसात निर्देशांक 1457 अंकांनी खाली गेला होता. विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतल्यामुळे गुंतवणूकदारांचे 5.47 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. रुपया-डॉलरच्या विनिमय दरात त्याचा परिणाम दिसून आला. डॉलरचा पुरवठा कमी झाल्यामुळे रुपया – डॉलरचा विनियम दर 78 रुपयांपर्यंत घसरला. तो यापुढेही घसरत राहील. रुपयाचे पानिपत असेच सुरू राहिले तर डॉलर रुपयाचा विनिमय दर, कुणी सांगावे, 90 रुपयांच्या पुढेही जाईल.

घाऊक किमतीवर आधारित महागाई मे महिन्यात 15.88 टक्के इतकी विक्रमी नोंदवली गेली. चलनवाढ गेले 14 महिने थोडीफार थोडीफार होत गेली. भाज्यांचे भाव 56 टक्के वाढले आहेत. बटाट्याचा भाव 25 टक्क्याने कडाडला. गहू 11 टक्क्याने महागला. अंडी, मांस व मासे यांचे भाव 8 टक्क्यांनी वाढले. अशीच भाववाढ 1975 च्या सुमारास झाली होती, तेव्हा श्रीमती इंदिरा गांधींनी समुद्रात भरपूर मासे असतात; तेव्हा लोकांनी भरपूर मासे खावेत, असा सल्‍ला दिला होता.

इंधनाची घाऊक भाववाढ 40 टक्क्यांच्या आसपास गेली आहे. क्रूड पेट्रोलियम व नैसर्गिक वायू यांच्यातही 80 टक्के भाववाढ झाली आहे. तेलबियांचे भाव 8 टक्क्यांनी वाढल्यामुळे घरगुती वापराचे सोयाबीन व सूर्यफुलाचे तेल महाग झाले आहे. बदलते हवामान, चार्‍याच्या वाढलेल्या किमती यांच्यामुळे महागाईत भर पडत आहे. मात्र कोरोनाच्या साथीला आपण यशस्वीरितीने तोंड दिले. पावसाळाही सुरू झाला आहे. त्यामुळे फळे व भाजीपाला यांचे भाव हळूहळू खाली येतील.भारताची अर्थव्यवस्था या सर्व संकटांतून सहीसलामत बाहेर पडून 5 ट्रिलियन डॉलरच्या दिशेने आपण पावले टाकत आहोत.

रिझर्व्ह बँकेने आपल्या यावेळच्या पतधोरणात पाठोपाठ दुसर्‍यांदा वाढ केली आहे. त्यामुळे तेवढ्याच प्रमाणात आपली कर्जे व ठेवी यावरील दरात 15 ते 25 पैशांपर्यंत वाढ केली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने 27 वर्षांपूर्वी इंटरनेट एक्स्प्लोअरर हा ब्राऊझर सुरू करून कॉम्प्युटर क्षेत्रात क्रांतीचे पाऊल टाकले होते. पण गेल्या बधुवारी 15 जूनपासून हा एक्स्प्लोअरर काढून टाकला आहे. इंटरनेट एक्स्प्लोअरर 1995 मध्ये प्रथम सुरू झाले. त्यावेळी विंडोज 95 ही कार्यप्रणाली घेणार्‍यांना इंटरनेट एक्स्प्लोअरर एक आकर्षण म्हणून दिले जायचे. त्यानंतर मायक्रोसॉफ्टने इंटरनेट एक्स्प्लोअरर हे अ‍ॅप विंडोज कार्यप्रणाली वापरणार्‍यांना एक आकर्षण म्हणून विनामूल्य द्यायला सुरुवात केली. आता मात्र तिचे आकर्षण कमी झाल्याने ते वापरणार्‍यांची संख्या रोडावली आहे. म्हणून हे इंटरनेट एक्स्प्लोअरर बंद करण्याचा निर्णय घेतला असावा. सध्याच्या काळात बचत, गुंतवणूक, व्यापारी तूट, वित्तीय तूट असे शब्द जरी कालबाह्य वाटत असले तरी स्टॅगफ्लेशन हे पुन्हा प्रकर्षाने अस्तित्वात येत आहे. चलनात वाढ केली गेली तर त्याचा परिणाम लगेचच खपषश्ररींळेप मध्ये होत असतो. उदा. चार वस्तू उपलब्ध आहेत; पण त्या घ्यायला जर जास्त चलन लागू लागले, तर खपषश्ररींळेप सुरू होते आणि वस्तूंचा पुरवठा वाढत नाही, तरी जास्त चलनाचा पुरवठा वाढल्यामुळे स्टॅग फ्लेशनची प्रक्रिया सुरू होते. थोडक्यात, स्टॅग फ्लेशन म्हणजे उत्पादन वाढरहित चलनवाढ.

चलन वाढले की महागाई वाढते आणि लोकांच्या क्रयशक्‍तीवर परिणाम होतो. यावर जालीम उपाय म्हणजे चलनवाढ संपूर्ण थांबवणे आणि वस्तूंच्या उत्पादनाला उत्तेजन देणे हे होय. भारतात वस्तूंचा पुरवठा सतत वाढता ठेवला गेल्याने आणि चलनवाढ होऊ न देण्याचे धोरण ठेवल्याने भारत स्टॅगफ्लेशनवर मात करण्यात यशस्वी झाला आहे. देशाची व्यापारी तूट मे 2022 मध्ये 24.3 अब्ज डॉलर इतकी उच्चांकी झाली आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2021 मध्ये व्यापारी तूट 22.91 अब्ज डॅलर इतकी होती. भारताची निर्यात मे 2022 मध्ये 20.55 टक्के वाढून 38.94 अब्ज डॉलरवर गेली आहे. त्याचबरोबर मे 2022 मध्ये आयात 62.83 टक्क्यांनी वाढून 63.22 अब्ज डॉलर झाली आहे.

दर आठवड्याला या लेखमालेत आपण एका कंपनीच्या शेअरची ‘चकाकता हिरा’ म्हणून निवड करीत असतो. पूर्वीच्या आठवड्यातील निर्देश केलेल्या पुढील कंपन्या अजूनही चकाकता हिरा म्हणून विचारात घेता येतील. ‘बजाज फायनान्स’, ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’, ‘इन्फोसिस’, ‘टाटा स्टील’, ‘अरबिंदो फार्मा’, ‘जे कुमार इन्फ्रा’, ‘चेन्‍नई पेट्रो’, ‘नवीन फ्युओर’, ‘हार्सेन टूब्रो इन्फोटेक.’ काही क्षेत्रांचाच विचार करायचा असला, तर वित्त (ऋळपरपलश । इरपज्ञळपस) आणि सेवा व औषध कंपन्या, विज्ञापन तंत्रज्ञान, टेलिकॉम ही नावे नजरेसमोर ठेवावीत. मात्र त्याचवेळी आपल्या पोर्टफोलिओत अनेक कंपन्यांची खिचडी करू नये. गुंतवणूक हे एक शास्त्र आहे. त्यातही भविष्यात डोकावण्याची जरूरी लक्षात घेऊन कंपन्यांची निवड करायला हवी. त्यासाठी जाणकारांचा सल्‍ला जरूर घेतला जावा. पण या सल्ल्याबरोबरच स्वाध्यायही विसरू नये.

Back to top button