FMCG कंपन्यांचा मोठा निर्णय : रोजच्या वस्तू छोट्या पॅकेजमध्ये, जाणून घ्या काय आहे प्लॅन? | पुढारी

FMCG कंपन्यांचा मोठा निर्णय : रोजच्या वस्तू छोट्या पॅकेजमध्ये, जाणून घ्या काय आहे प्लॅन?

पुढारी ऑनलाईन : FMCG कंपन्यांनी देशभरात झपाट्याने वाढणाऱ्या महागाईला तोंड देण्यासाठी नवीन योजना तयार केली आहे. दैनंदिन वापरातील उत्पादने बनवणाऱ्या कंपन्यांनी देशात वाढणाऱ्या महागाईचे आव्हान पेलण्यासाठी उत्पादनाचे वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय अनेक कंपन्यांनी ‘ब्रिज पॅक’ही लॉन्च केले आहेत. ब्रिज पॅक म्हणजेच कोणत्याही उत्‍पादनाची कमाल आणि सर्वात कमी किंमत यामधील उत्‍पादन असते.

मान्सून अंदमानात दाखल, केरळमध्ये पोहोचण्यासाठी अनुकूल वातावरण

वजन कमी केल्यामुळे FMCG कंपन्यांना पॅकेज केलेल्या उत्पादनांच्या किमती वाढवाव्या लागल्या नाहीत. कमी उत्पन्न गटातील ग्राहकांना लक्ष्य करून कंपन्या असे पाऊल उचलत आहेत. याशिवाय FMCG कंपन्यांनी उत्पादनाच्या मोठ्या पॅकेटच्या किमतीत वाढ केली आहे. मात्र, ही वाढही १० टक्क्यांपेक्षा कमी आहे.

भंडारा : मुलाचे लग्न लावून दिल्याने बहिणीवर चाकूने वार करुन भावाचे विषप्राशन

स्वस्त पॅकेजिंगचा वापर

रशिया-युक्रेन युद्धामुळे उद्भवलेल्या संकटामुळे उत्पादन निर्मिती खर्चात मोठी वाढ झाली आहे. याचा मुकाबला करण्यासाठी FMCG उत्पादक स्वस्त पॅकेजिंग, रिसायकलिंग करून उत्पादने बाजारात आणत आहेत. FMCG कंपन्या जाहिरात आणि विपणन खर्चात कपात करत आहेत.

काँग्रेस आगामी मनपा निवडणुकीत राबविणार एक परिवार, एक तिकीट धाेरण : नाना पटोले

वस्तूंच्या वाढत्या किमती आणि गगनाला भिडणारी महागाई यामुळे ग्राहक कमी खर्च करण्यास प्राधान्य देत आहेत. ग्राहकांना ‘लो युनिट प्राईस (LUP)’ पॅक खरेदी करायचे आहेत जेणेकरुन त्यांचे बजेट विस्कळीत होऊ नये. डाबर इंडियाचे सीईओ मोहित मल्होत्रा ​​म्हणाले, “शहरी बाजारपेठेतील ग्राहकांचे दरडोई उत्पन्न आणि खर्च करण्याची क्षमता जास्त आहे, म्हणून आम्ही मोठ्या पॅकच्या किमती वाढवल्या आहेत. LUP पॅक ग्रामीण बाजारपेठेत विकले जातात, त्यांच्यासाठी उत्पादनाचे वजन कमी केले गेले आहे.

अशी कीड योग्यवेळी ठेचली पाहीजे ; रुपाली चाकणकरांचा सदाभाऊंवर निशाणा

येत्या तिमाहीत महागाई कमी होण्याची चिन्हे नाहीत. अशा परिस्थितीत अनेक कंपन्यांनी किमती वाढवण्याऐवजी उत्पादनांच्या वजनात कपात केली आहे. पार्ले प्रॉडक्ट्सचे मयंक शाह म्हणाले की, ग्राहकांचा कल व्हॅल्यू पॅककडे वळला आहे आणि LUP पॅकची विक्री काही प्रमाणात वाढली आहे. एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेसचे कार्यकारी उपाध्यक्ष अबनीश रॉय म्हणाले की, पैसे वाचवण्यासाठी ग्राहक लहान पॅक खरेदी करत आहेत आणि हे सर्व FMCG श्रेणींमध्ये घडत आहे.

Back to top button