संयमाने व्यवहार करावेत | पुढारी | पुढारी

संयमाने व्यवहार करावेत | पुढारी

डॉ. वसंत पटवर्धन

शेअरबाजार आता स्थिरावला आहे. मार्च 2018 च्या तिमाईचे नववर्षाचे अनेक कंपन्यांचे आकडे उत्तम येत आहेत. विक्री व करोत्तर नफ्यात चांगली वाढ दिसत आहे. गेल्या आठवड्यात येस बँक, रिलायन्स कॅपिटल, इंडिया बुल्स हाऊसिंग, टाटा एलेक्सी, महिंद्र अँड महिंद्र फायनान्शियल व आयडीएफसी बँकेचे आकडे प्रसिद्ध झाले.

येस बँकेचे कर्जावरील व्याजाचे उत्पन्‍न या तिमाहीसाठी 4404.41 कोटी रुपये होते. गुंतवणुकीवरील उत्पन्‍न 1179.44 कोटी रुपये होते. एकूण उत्पन्‍न 7163.95 कोटी रुपये होते नक्‍त नफा 1179.44 कोटी रुपये आहे. मार्च 2017-18 या पूर्ण वर्षाचे एकूण उत्पन्‍न 25581.74 कोटी रुपये होते. नफ्त नफा 4233.21 कोटी रुपये होता व शेअरगणिक उपार्जन 1846 रुपये आहे.

सध्या येस बँकेच्या शेअरचा भाग 348 रुपये आहे. पण तो 382 रुपयांपर्यंतही चढला होता. महिन्यापूर्वी तो 303 रुपयाला मिळाला होता. अजूनही भाव वाढून 425 रुपयांपर्यंत जाऊ शकेल. वर्षातील किमान भाव 276 रुपये होता. तिथे खरेदी करणार्‍यांना 50 टक्के नफा दिसणार आहे. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर 22.55 पट दिसते. रोज तीन कोटी शेअर्सचा व्यवहार होत आहे. बेसिक 3 नियमानुसार भांडवल 18 टक्के आहे. स्टरलाईट टेक्नॉलॉजीचे या तीन महिन्यांचे उत्पन्‍न 846.64 कोटी रुपये आहे. अन्य उत्पन्‍न 17.17 कोटी रुपये आहे. शेअरगणिक उपार्जन 2.77 रुपये आहे.

आयडीएफसी बँकचे या तीन महिन्यांचे एकूण उत्पन्‍न 2374.35 कोटी रुपये आहे. 244.46 कोटी रुपयांच्या तरतुदी अनार्जित कर्जासाठी केल्यानंतरचा करोत्तर नफा 41.93 कोटी रुपये आहे. बँकेचे भागभांडवल 3404.07 कोटी रुपये इतके प्रचंड आहे. केंद्र सरकारकडे भांडवलापैकी 7.6 टक्के शेअर्स आहेत. गृहवित्त क्षेत्रातील जी.आय.सी. हाऊसिंग फायनान्सचे पूर्ण वर्षाचे 1126.37 कोटी रुपये आहे. नक्‍त नफा 184.43 कोटी रुपये आहे. भागभांडवल 53.85 कोटी रुपये आहे.

टाटा  एलेक्सी ही संगणक क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी आहे. तिचे 2017-18 वर्षाचे उत्पन्‍न 1386.29 कोटी रुपये होते. नक्‍त नफा 240.04 कोटी रुपये होता. भागभांडवल 62.27 कोटी रुपये आहे. शेअरचा भाव सध्या 1200 रुपयांच्या आसपास आहे. गेल्या 12 महिन्यांतील कमाल व किमान भाव अनुक्रमे 1248 रुपये व 641 रुपये होते. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर 35.23 पट आहे. पुन: जेव्हा भाव 900 रुपयांखाली येतील तेव्हा तो दीर्घ मुदतीसाठी द्यावा. टाटा कन्सल्टसी सर्व्हिसेससारखीच ही उत्कृष्ट कंपनी आहे. रोज 5 ते 51/2 लक्ष शेअर्सचा व्यवहार होतो.

सिंजेन इंटरनॅशनल या औषधी क्षेत्रातील नामवंत कंपनीची 2017-18 पूर्ण वर्षाची विक्री 1423.10 कोटी रुपये होती. अन्य उत्पन्‍न 61.89 कोटी रुपये होते. नक्‍त नफा 305.40 कोटी रुपये होता.

महिंद्र अँड महिंद्र फायनान्शियल सर्व्हिसेसचे 2017-18 या पूर्ण वर्षांचे उत्पन्‍न 8576.49 कोटी रुपये आहे. अनार्जित कर्जासाठी 1327.35 कोटी रुपये बाजूला काढत नक्‍त नफा 1023.91 कोटी रुपये झाला. सध्या शेअरचा भाव 518 रुपये आहे. गेल्या वर्षभरातील कमाल व किमान भाव अनुक्रमे 526 रुपये व 290 रुपये होते. रोज साडेसात लक्ष शेअर्सचा व्यवहार होतो. हा शेअर पुन्हा 300 रुपयांपर्यंत मिळाला तर जरूर घ्यावा. किंबहुना सर्वच नॉन बँक फायनान्शियल कंपन्यांचे शेअर्स यापुढेही तेजाळतील. बजाज फायनान्स एल अँड टी फायनान्स कॅपिटल फर्स्ट, मुधूर फायनान्स, मन्‍नापूरम फायनान्स हे सर्व शेअर्स सध्या वाढले आहेत. सध्यापेक्षा ते दहा टक्के कमी झालेही, त्यापैकी कुठलेही वा सर्व, दीर्घमुदतीसाठी द्यावेत.

सध्याचा बाजार हा सतत तेजीकडे जाणारा आहे. मिडास राजाप्रमाणे प्रत्येक शेअर सोन्यासारखा होणार आहे. मात्र निवड योग्य हवी व निदान एक वर्ष मुदतीसाठी थांबायची तयारी हवी. उगीच लोभ व भीती न बाळगता, संयमाने व्यवहार करावेत. सध्या नॉन – बँकिंग फायनान्स कंपन्या, धातू कंपन्या, खासगी बँका, गृहवित्त कंपन्या, इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपन्या (विशेषत: महामार्ग व निवासिका बांधणार्‍या कंपन्या, ग्राफाईट कंपन्या, निवडक मोठ्या संगणक कंपन्या या क्षेत्रातील प्रत्येकी तीन कंपन्या निवडण्यात ही 20 कंपन्या भागभांडारात समाविष्ट करता येतील. त्या कुठल्या असाव्यात याबाबत या लेखमालेत वेळोवेळी विस्तृत परामर्श घेतला जातो.

गेल्या आठवड्यांत दिवाण हौसिंग एकदम 632 रुपयांपर्यंत चढला आहे. या व जून, सप्टेंबर, तिमाहीचे आकडे येथील तेव्हा तोदेखील किमान 5 टक्के वाढून दिवाळीला 720 रुपयांपर्यंत जावा. रेकी होम्स व इंडिया बुल्स हौसिंगही तसेच वाढतील. सर्व शेअर्स वर जात असल्याने गेल्या शुक्रवारी निर्देशांक 35000 ची सीमा ओलांडून 35050 पर्यंत पोचला होता. दिवाळीपर्यंत ती 38500 व्हावा. निफ्टीही गेल्या शुक्रवारी 10710 पर्यंत वर गेला होता. तो दिवाळीपर्यंत 11800 पर्यंत जावा. गुंतवणूकदारांसाठी हे वर्ष अधिक फळ देणारे आहे. कारण पंचांगाप्रमाणे यंदा एक अधिक महिना आहे.

श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स, चोळमंडलम  इन्व्हेस्टमेंट हे शेअर्सही खूप वाढले आहेत. त्याची विक्री करून दिवाण हौसिंग, स्टारलाईट टेक्नॉलॉजी, येस बँक, बजाज फायनान्स, मिधान, वेदांत, ग्राफाईट इंडिया, हेग इथे गुंतवणूक करता येतील. आपले सध्याचे भाग भांडार कसे आहे ते बघून मग त्यात नसलेले शेअर्स द्यावेत. मात्र एकूण कंपन्यांची संख्या 15 ते 20 इतकीच असावी.

Back to top button