स्टरलाईट टेक्नॉलॉजीस | पुढारी | पुढारी

स्टरलाईट टेक्नॉलॉजीस | पुढारी

यावेळचा चकाकता हिरा म्हणून स्टरलाईट टेक्नॉलॉजीसची निवड केली आहे. तिला नुकतेच 4500 कोटी रुपयांचे एक काँट्रॅक्ट मिळाले आहे व ते दोन वर्षात पुरे करायचे आहे. विंध्या टेलिलिंक्सप्रमाणे ही कंपनीही ऑप्टिकल फायबर केबल्सचे उत्पादन करते. किनारी मार्ग म्हणून भारतमाला वा सागरमळा प्रकल्प 15000 किलोमीटर्सचा उभा राहत आहे. त्यात या कंपनीचा मोठा वाटा असेल. तिला निर्यातीच्या ऑर्डसही आहेत. मार्च 2018 तिमाहीची तिची विक्री 846.6 कोटी रुपये होती. मार्च 2017 तिमाईच्या विक्रीपेक्षा ती 20 टक्के जास्त आहे.

यावेळी ढोबळ नफा (एइखढऊअ) 220 कोटी रुपये झाला. नक्‍त नफा 112.4 कोटी रुपये झाला. ढोबळ नफ्याचे 25 टक्के आहे. दूरवहन कंपन्यांच्या 4जी नेटवर्कसाठी या केबल्स लागतात. त्यामुळे येत्या सव्वा वर्षात उत्पादन क्षमता 4 कोटी फायबर किलोमीटर्स इतकी करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. सध्याच्या उत्पादनापेक्षा ते 25 टक्के जास्त आहे. सिस्टिम्स अ‍ॅड नेटवर्क इंटिग्रेशन व सॉफ्टवेअरमध्ये ती जास्त काम करणार आहे. 3500 कोटी रुपयांची मिळालेली ऑर्डर भारतीय नौकांतर्फे आहे.

सध्या 338 रुपयाला हे शेअर मिळत आहे. वर्षभरात त्यात 30 टक्के वाढ होऊन तो 445 रुपयांपर्यंत जावा. गेल्या बारा महिन्यांतील किमान व कमाल भाव अनुक्रमे 144 रुपये व 415 रुपये होते. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर 45 पट दिसते. रोज 8 ते 14 लक्ष शेअर्सचा व्यक्‍त होतो. (विंध्या टेलिलिक्सचे गुणोत्तर मात्र 16.54 पट आहे. सध्या भाव 1215 रुपयांच्या आसपास आहे. वर्षातील किमान भाव 670 रुपये होता व कमाल भाव 1475 रुपये होता.

कंपनीची मार्च 2019 व मार्च 2020 वर्षाची संभाव्य विक्री 4 हजार 150 कोटी रुपये व 5520 कोटी रुपये व्हावी. ढोबळ नफा अनुक्रमे 925 कोटी रुपये व 1250 कोटी रुपये व्हावा. कंपनीचे 2017 व 2018 मार्चचे शेअरगणिक उपार्जन अनुक्रमे 5.1 व 8.4 रुपये होते. मार्च 2019 व 2020 वर्षासाठी ते अनुक्रमे 10.1 रुपये व 14.6 रुपये व्हावे. त्यामुळे मार्च 2017 वर्षासाठी पडलेले किं/उ गुणोत्तर 67.7 पट होते ते 23.4 इतके उत्तम होईल. गुंतवलेल्या भांडवलावर 20 ते 25 टक्के नफा मिळेल. कंपनीच्या प्रवर्तकांकडे 54 टक्के भाग भांडवल आहे. विदेशी गुंतवणूक कंपन्यांकडे ते 8.50 टक्के आहे. भारतातील औद्योगिक कंपन्यांकडे ते 11 टक्के आहे व जनतेकडे ते 26.43 टक्के आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ कंपनीच्या शेअर्सकडे ते 26.43 टक्के आहे. भारतीय आयुर्विमा समूहानेदेखील या कंपनीत बरीच गुंतवणूक केली आहे. हाँगकाँगच्या फायडेल्टी मॅनेजमेंट अँड रिसर्चचीही कंपनीत गुंतवणूक आहे. 2019 व 2020 वर्षांसाठी कंपनीचा नफा 410 कोटी व 580 कोटी रुपये होऊ शकतो. दोन वर्षात कंपनीच्या शेअरचे पुस्तकी मूल्य 49 रुपये व्हावे.

Back to top button